Jawa-Yezdi
Jawa-Yezdi esakal
विज्ञान-तंत्र

Jawa-Yezdi : टू व्हीलर मध्ये चालली नाही महिंद्राची जादू, जावा-येझडीचे कमबॅक फसले

सकाळ डिजिटल टीम

Jawa-Yezdi : 1960 ते 90 च्या दशकापर्यंत भारतीय रस्त्यांवर जावा-येझडी बाइक्सचं वर्चस्व होतं. पण 1996 मध्ये या बाईकच्या युरोपियन कंपनीने उत्पादन बंद केलं आणि या गाड्या विस्मरणात गेल्या. पण 2018 मध्ये तब्बल 22 वर्षांनंतर Jawa ने महिंद्रा कंपनी सोबत टायअप करून Jawa 293cc आणि Jawa Forty Two लाँच करून भारतात पुनरागमन केलंय.

तर 25 वर्षांनी म्हणजेच 2022 मध्ये येझडी स्क्रॅम्बलर, रोडस्टर आणि अॅडव्हेंचर मोटरसायकल बाजारात आल्यात. सुरुवातीला भरघोस बुकिंग मिळाल्यानंतर त्यांची कामगिरी पुन्हा ढासळली.एकेकाळी दहशत निर्माण करणाऱ्या जावा आणि येझडीने जोशात पुनरागमन केलं पण या दोन्ही ब्रँडना पूर्वीसारखी जादू निर्माण करता आली नाही. या दोन्ही ब्रँडची सरासरी मासिक विक्री 3,000-3,500 युनिट्स आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या मते, फेब्रुवारी 2023 मध्ये या बाईकचा टू व्हीलर मार्केट मध्ये फक्त 0.25 टक्के हिस्सा होता.

रॉयल एनफिल्डशी टक्कर देणार का?

या गाड्यांच्या सेगमेंटमध्य रॉयल एनफिल्डची 350cc एकदम मजबूत आहे. पण मासिक विक्री कमी असल्याने महिंद्राच्या जावा-येझडी मोटरसायकल रॉयल एनफिल्ड बाईकशी कशाप्रकारे स्पर्धा करतील? गेल्या महिन्यात, रॉयल एनफिल्डचा टू व्हीलर मार्केट मधील हिस्सा 5.07 टक्के होता आणि किरकोळ विक्री 64,195 युनिट्स होती.

जावा-येझडीचा त्रास

कंपनीला पुरवठा साखळी, दीर्घ प्रतीक्षा कालावधी, दर्जेदार भाग आणि फिनिशिंग, सेमी-कंडक्टर अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. क्लासिक लीजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणतात की, मागचे नऊ महिने आमच्यासाठी पहिले स्थिर नऊ महिने आहेत. पण सेमी-कंडक्टर चिप्सची कमतरता असल्यामुळे ही परिस्थिती असू शकते असं त्यांचं मत आहे.

जावा-येझदी मोटारसायकली विकणारी महिंद्राची कंपनी क्लासिक लीजेंड्स हे सगळे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील तिमाहीपर्यंत कंपनी ५०० डीलरशिपचा आकडा गाठण्याचे काम करत आहे. कंपनी लवकरच एक किंवा दोन नवीन मोठ्या बाईक्स लाँच करणार आहे. दरम्यान, कंपनीचा तिसरा ब्रँड BSA ने आधीच यूकेमध्ये 5,000 बाईक विकल्या आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राने 2008 मध्ये महिंद्रा टू व्हीलर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून प्रथमच दुचाकी विभागात प्रवेश केला. महिंद्रा सेंचुरो मोटरसायकल व्यतिरिक्त, कंपनीने ड्युरो आणि रोडियो नावाच्या स्कूटर देखील सादर केल्या आहेत. सध्या ही कंपनी Mahindra Mojo 300 BS6 विकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT