Jeep Meridian
Jeep Meridian Sakal
विज्ञान-तंत्र

Fortuner आणि Gloster ला टक्कर देणार ही नवी SUV; 19 मे रोजी किंमत होणार जाहीर

सकाळ डिजिटल टीम

Jeep Meridian: जीप मेरिडियन एसयूव्हीची किंमत 19 मे रोजी जाहीर होणार आहे. जीप मेरिडियन थ्री-रो एसयूव्ही लिमिटेड आणि लिमिटेड ऑप्शन या दोन व्हेरियंटमध्ये येणार असून ती फक्त डिझेल एसयूव्ही असेल. जीपने नुकतेच नवीन मेरिडियन एसयूव्हीचे स्थानिक उत्पादन सुरू केले. या एसयूव्हीचे प्री-बुकिंग रु. 50,000 मध्ये केले जाऊ शकते. जीप मेरिडियन एसयूव्हीची किंमत टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टर रेंजच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे.

इंजिन आणि स्पीड-

मेरिडियन एसयूव्ही 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिनशी जोडलेली आहे. तिच्यात सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही SUV 198 kmph च्या टॉप स्पीड देऊ शकते आणि फक्त 10.8 सेकंदात 100 kmph वर जाऊ शकते. मेरिडियन एसयूव्ही फ्रंट व्हील आणि ऑल-व्हील ड्राइव्ह पर्यायांसह येते.

वैशिष्ट्ये-

जीप मेरिडियन ही थ्री-रो एसयूव्ही असून तिच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग आहेत. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री पार्क असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय एलईडी हेडलॅम्प, डीआरएल, फॉग लॅम्प आणि सनरूफसह 7 उभ्या ग्रिलचा वापर करण्यात आला आहे. ही एसयूव्ही 18 इंच अलॉय व्हीलसह येते. जीप मेरिडियनचे बुकिंग मे महिन्यात सुरू होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT