Caller Name Presentation feature : जिओ, एअरटेल आणि Vi वापरकर्त्यांना लवकरच एक नवीन सुविधा मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना इनकमिंग कॉल्सवर कॉलरचे नाव त्यांच्या आधार कार्डावरील माहितीनुसार दिसेल. या सुविधेचा उद्देश फोन कॉल्सवरील फसवणूक आणि अनावश्यक मार्केटिंग कॉल्सवर नियंत्रण मिळवणे आहे.
भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हीआय या "कॉलर नेम प्रेझेंटेशन" (CNAP) नावाच्या नव्या फीचरची अंमलबजावणी लवकरच सुरू करणार आहेत. या फीचर्सद्वारे कॉल करणाऱ्याचे नाव त्याच्या KYC (कस्टमर युअर क्योर) आधारे, मुख्यतः आधार कार्डानुसार दाखवले जाईल. त्यामुळे तिसऱ्या पक्षांच्या अॅप्सचा वापर, जसे की 'ट्रू कॉलर', कमी होईल.
भारतीय टेलिकॉम कंपन्या या फीचरच्या अंमलबजावणीसाठी HP, Dell, Ericsson आणि Nokia यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांशी सहकार्य करत आहेत. यापूर्वी, टेलिकॉम रेग्युलटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने या सुविधेची शिफारस फेब्रुवारी 2024 मध्ये केली होती आणि भारतीय दूरसंचार विभाग (DoT) ने ऑपरेटरांना या सुविधेचा अंमल जलदगतीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
कॉलर नेम प्रेझेंटेशन (CNAP) या फीचरच्या अंतर्गत वापरकर्त्यांना कॉल करणाऱ्याचे नाव त्याच्या KYC डॉक्युमेंट्सनुसार दिसेल. यामध्ये मुख्यतः आधार कार्ड समाविष्ट आहे. त्यामुळे यावर आधारीत कॉलरचे नाव अधिकृतपणे दाखवले जाईल. यात तिसऱ्या पक्षांच्या अॅप्सवर आधारित माहितीची आवश्यकता नाही. यामुळे वापरकर्त्यांना फोनवर आलेल्या कॉल्सचा अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित अनुभव मिळेल.
या सुविधेचा उद्देश विशेषतः अनवट आणि स्पॅम कॉल्सला कमी करणे आहे, जे वापरकर्त्यांसाठी एक मोठे आश्वासन असू शकते.
कॉलर नेम प्रेझेंटेशन फीचरचे अंमलबजावणी एकाच वेळी सर्व वापरकर्त्यांवर होणार नाही. हि सुविधा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल, ज्यामुळे वापरकर्त्यांना अनावश्यक कॉल्स कमी होण्याची आशा आहे आणि त्यांच्या कॉलिंग अनुभवामध्ये सुधारणा होईल. यामुळे ग्राहकांना अधिकाधिक सुरक्षित आणि व्यक्तिगत सेवा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.