Terrorist Threat on IPL 2022  sakal
विज्ञान-तंत्र

IPL पाहाण्यासाठी बेस्ट रिचार्ज प्लॅन; मिळतो 3GB पर्यंत डेटा, फ्री Disney+ Hotstar

सकाळ डिजिटल टीम

दोन दिवसांत म्हणजेच 26 मार्चपासून आयपीएल 2022 (IPL 2022) सुरू होत आहे. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर IPL सामने लाईव्ह पाहू शकणार आहात. पण जर तुमच्याकडे Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आज आपण Reliance Jio आणि Vodafone-Idea च्या काही बेस्ट प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये Disney + Hotstar च्या मोफत सब्सक्रिप्शनसह दररोज 3 GB पर्यंत डेटा उपलब्ध आहे.

Vodafone-Idea चे प्लॅन

कंपनी आपल्या 601 आणि 901 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते आहे. कंपनीचा 601 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 GB डेटा आणि 100 मोफत एसएमएस मिळतात. प्लॅनमध्ये, कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 16 जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल.

901 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 48 GB मोफत अतिरिक्त डेटाचाही लाभ मिळेल. या प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत एसएमएससह देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची ऑफर देत आहे. या दोन्ही Vodafone-Idea प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत, ज्यात Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight यांचा समावेश आहे.

Jio चे प्लॅन

Jio आपल्या वापरकर्त्यांना Disney + Hotstar सह अनेक प्लॅन ऑफर करत आहे, परंतु आम्ही तुम्हाला यापैकी दोन सर्वोत्तम प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जिओचा 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देतो. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio अॅप्सचाही मोफत एक्सेस मिळेल. प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.

त्याचप्रमाणे, कंपनी आपल्या 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. 28 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटासह 6 GB अतिरिक्त डेटा मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी अमर्यादित कॉलिंग, दररोज विनामूल्य एसएमएस आणि Jio अॅप्सवर विनामूल्य एक्सेस देखील देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT