Jio Sakal
विज्ञान-तंत्र

Mobile Recharge Plans: अवघ्या १५५ रुपयात २८ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग-डेटासह अनेक फायदे, पाहा डिटेल्स

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंनपन्यांपैकी एक असलेल्या जिओकडे प्रत्येक ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे २०० रुपयांच्या कमी बजेटमध्ये येणारा जबरदस्त प्लॅन आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jio Mobile Recharge Plans: देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंनपन्यांपैकी एक असलेल्या जिओकडे प्रत्येक ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीला कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देण्यासाठी ओळखले जाते. कंपनीकडे २०० रुपयांच्या कमी बजेटमध्ये येणारा जबरदस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएससह अनेक फायदे मिळतील. Jio च्या या रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Jio चा १५५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio कडे १५५ रुपयांचा शानदार प्लॅन उपलब्ध असून, याची वैधता २८ दिवस आहे. तुम्हाला २८ दिवसांसाठी देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, एकूण २ जीबी डेटा आणि एकूण १००० एसएमएस दिले जातात. प्लॅनमध्ये डेटा संपल्यास तुम्ही ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Jio चा ३९५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

कंपनीकडे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा ३९५ रुपये किंमतीचा रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइश कॉलिंग आणि एकूण १००० एसएमएस दिले जात आहे. तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

हेही वाचा: Year Ender 2022: यंदाच्या वर्षात 'या' गाड्यांना मिळाला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद, फीचर्समध्ये अव्वल

Jio चा १,५५९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

तुम्ही जर जास्त दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन शोधत असाल तर १,५५९ रुपयांचा रिचार्ज करू शकता. या प्लॅनची वैधता ३३६ दिवस आहे. यामध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज २४ जीबी डेटा आणि एकूण ३००० एसएमएस दिले जातात. प्लॅनमधील इंटरनेट संपल्यावर ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकते. इतर प्लॅनप्रमाणेच यातही Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT