Jio
Jio sakal
विज्ञान-तंत्र

Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; फक्त 1 रुपयात 30 दिवस व्हॅलिडिटी

सकाळ डिजिटल टीम

Jio Prepaid Recharge Plan : Jio ने एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Prepaid Plan) सादर केला आहे. हा नवीन प्लॅन देशातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Cheapest-Recharge Plan) असून या प्लॅनची ​​किंमत अवघी 1 रुपये आहे आणि यामध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधता दिली जाते. हा स्वस्त रिचार्ज प्लॅन अशा ग्राहकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना जास्त डेटाची गरज पडत नाही. याशिवाय, हा रिचार्ज प्लॅन सध्या MyJio App वर उपलब्ध आहे, परंतु तो जिओच्या वेबसाइटवर लिस्टेड नाहीये.

TelecomTalk च्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे की, Jio चा 1 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये ग्राहकांना वापरण्यासाठी 100MB डेटा मिळतो. हा डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत घसरते. जिओचा हा नवीन रिचार्ज प्लॅन तुम्हाला MyJio App वरील व्हॅल्यू सेक्शन मध्ये मिळेल. सध्या हा प्लॅन जिओच्या वेबसाइटवर लिस्ट केलेला नाही. हा प्लॅन तुम्ही 10 वेळा वापरल्यास, तुम्हाला 1 GB हाय स्पीड डेटा मिळेल, जे Jio च्या 15 रुपयांच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहे. 15 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा दिला जातो.

जिओच्या एक रुपयाच्या प्लॅनचे फायदे

जिओच्या एक रुपयाच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या बेनिफीट्सबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये एकूण 30 दिवसांची वैधता देण्यात आले आहेत. Jio कडून ग्राहकांना एक रुपयाच्या प्लॅनमध्ये 100 MB हायस्पीड डेटा दिला जात आहे. जेव्हा या प्लॅनची ​​100 MB डेटा मर्यादा संपेल, तेव्हा इंटरनेटचा स्पीड 60 kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा दिलेली नाही. त्यामुळे तुमचे सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी हा प्लॅन खूप फायदेशीर ठरू शकतो.

भारतातील सर्वात स्वस्त प्लॅन

सध्या जिओचा एक रुपयाचा प्लॅन हा भारतातील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बनला आहे. जिओ व्यतिरिक्त, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल किंवा बीएसएनएल आणि एमटीएनएल कडून देखील एक रुपयांचा प्लॅन देण्यात येतात, \ देशात अनेक लोक आर्थिकरित्या दुर्बल लोकांची संख्या मोठी आहे, ज्यांच्याकडे इंटरनेटचा वापर अगदीच मर्यादित स्वरुपात केला जातो आहे. अशा गरजू ग्राहकांसाठी जिओने 1 रुपये किमतीचा डेटा प्लॅन दिला आहे. Jio च्या एक रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त, टॉप-अप प्लान 10 आणि 20 रुपयांच्या किमतीत येतात. 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये, 7.47 रुपयांचा टॉक-टाइम अमर्यादित वैधतेसह येतो. तर 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये, 14.95 रुपयांचा टॉकटाइम अमर्यादित वैधतेसह उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT