Jio Space Fiber eSakal
विज्ञान-तंत्र

Jio Space Fiber : आता अंतराळातून इंटरनेट पुरवणार जिओ; 'स्पेस फायबर' टेक्नॉलॉजी सादर

सॅटेलाईट इंटरनेट पुरवण्यासाठी जिओ SIS कंपनीचे उपग्रह वापरणार आहे.

Sudesh

इलॉन मस्क ज्याप्रमाणे आपल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवतो; अगदी तशीच सेवा देण्यासाठी जिओ सज्ज झालं आहे. इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये जिओने आपली Jio Space Fiber सेवा सादर केली. ही सॅटेलाईट-आधारित गिगा फायबर टेक्नॉलॉजी असणार आहे.

ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारले जाऊ शकत नाहीत, किंवा ब्रॉडबँड इंटरनेट सेवा दिली जाऊ शकत नाही; अशा ठिकाणी इंटरनेट उपलब्ध करण्यासाठी हे टेक्नॉलॉजी कामी येईल. जिओच्या भारतात आधीपासूनच Jio Fiber ब्रॉडबँड आणि Jio AirFiber या दोन सेवा उपलब्ध आहेत.

सध्या चार ठिकाणी उपलब्ध

जिओ स्पेस फायबर सेवा सध्या भारतात चार ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यान, छत्तीसगडमधील कोरबा, ओडिशामधील नबरंगपुर आणि आसाममधील ONGC-जोरहाट या ठिकाणांचा समावेश आहे. सामान्यांसाठी याचा वापर कधी सुरू करण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सॅटेलाईट इंटरनेट पुरवण्यासाठी जिओ SIS कंपनीचे उपग्रह वापरणार आहे. स्पेस फायबरच्या वापरामुळे आतापेक्षा कित्येक पटींनी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट स्पीड मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. याचा डेमो आज कंपनीचे चेअरमन आकाश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींनाही दाखवला. भारतात परवडणाऱ्या दरात सॅटेलाईट इंटरनेट उपलब्ध करण्याचा कंपनीचा मानस असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT