jio phone 5g expected to launch in india soon check price and specifications  
विज्ञान-तंत्र

Jio Phone 5G : लवकरच लॉंच होऊ शकतो जिओचा 5G फोन, जाणून घ्या किंमत

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्व टेलिकॉम कंपन्या 5G लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. Jio, Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही कंपन्यांनी 5G चाचणी पूर्ण केली आहे आणि व्यावसायिक लॉन्च देखील लवकरच होईल. गेल्या वर्षी, Google च्या भागीदारीत, Jio ने 4G स्मार्टफोन Jio Phone Next सादर केला होता आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार Jio ही 5G फोनची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, जिओ फोन 5G लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो.

Jio Phone 5G कधी लाँच होईल?

जिओ फोन 5G बद्दल सांगितले जात आहे की हा फोन या वर्षाच्या अखेरीस लाँच केला जाईल. जिओ फोन 5G ची किंमत ही 12,000 रुपयांच्या जवळपास असू शकते आणि जर हे खरेच असेल तर हा देशातील सर्वोत्तम 5G फोन असू शकतो. मात्र दुसऱ्या एका रिपोर्टनुसार जिओ फोन 5G ची किंमत फक्त 2,500 रुपये असेल. त्यासोबतच जिओ फोन 5G हा फीचर फोन असेल अशीही अपेक्षा आहे. याशिवाय, असा दावाही केला जात आहे की, 2,500 रुपयांचे डाउन पेमेंट असेल आणि उर्वरित रक्कम ईएमआयद्वारे भरावी लागेल. फोनसोबत कॉलिंग आणि डेटा सारख्या सुविधा दिल्या जाऊ शकतात.

Jio Phone 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

जिओ फोन 5G च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.5-इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचे रिझोल्यूशन 1600x720 पिक्सेल असेल. फोनला स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर आणि 4 GB रॅमसह 32 GB स्टोरेज मिळेल. हा सर्वात स्वस्त 5G प्रोसेसर आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास जिओ फोन 5G सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो असेल. समोर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. जिओ फोन 5G मध्ये Pragati OS देखील आढळू शकते जे जिओ फोन Next मध्ये देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT