Reliance jio google
विज्ञान-तंत्र

Reliance Jio दिवाळी धमाका! Jio 5G, 4G फोन वापरकर्त्यांसाठी ‘ही’ आहे खास ऑफर

जिओची महत्त्वाकांक्षी 5G रोलआउट योजना जगातील सर्वात वेगवान असेल असे कंपनीने सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

रिलायंस इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 5G सेवेबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी दिवाळीपर्यंत Jio 5G सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये दिवाळी 2022 पर्यंत ही सेवा सुरू होईल. डिसेंबर 2023 पर्यंत 18 महिन्यांत संपूर्ण भारतातील इतर शहरांत देखील Jio 5G सेवा सुरु होईल. जिओची महत्त्वाकांक्षी 5G रोलआउट योजना जगातील सर्वात वेगवान असेल असे कंपनीने सांगितले आहे.

Jio चे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी राजस्थानमधील राजसमंद येथील श्रीनाथजी मंदिरात 5G लाँच केले. यासोबत कंपनीने Jio True 5G  नेटवर्कवर चालणाऱ्या Wi-Fi सेवा सुरू केल्या. ही सेवा शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वेस्टेशन, बस स्टँड अशा ठिकाणी दिली जाईल. Jio True 5G पॉवर Wi-Fi राजस्थानमधील नाथद्वार  शहरातून लॉन्च करण्यात आले.

 नुकतीच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. कंपनी लवकरच इतर शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.

Jio True 5G Wi-Fi चे फायदे :

  • जिओ वापरकर्त्यांना 'वेलकम-ऑफर' कालावधीत मोफत Wi-Fi  सेवा मिळेल.

  • 5G स्मार्टफोनशिवायही Wi-Fi शी कनेक्ट करून, 4G स्मार्टफोनवरही 5G इंटरनेटचा लाभ घेता येईल.

  • दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीनंतर आता नाथद्वार आणि चेन्नई Jio True 5G नेटवर्कशी जोडले गेले आहेत

  • जिओ वापरकर्त्यांसाठी नवीन Wi-Fi सेवा जिओ वेलकम ऑफरच्या कालावधीत मोफत मिळेल.

  • इतर नेटवर्क वापरणारे देखील Jio 5G Wi-Fi चा मर्यादित वापर करू शकतील.

  • Jio 5G वर चालणाऱ्या Wi-Fi ची संपूर्ण सेवा वापरायची असेल, तर Jio चे ग्राहक बनावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT