Juice Jacking Scam eSakal
विज्ञान-तंत्र

Juice Jacking : चार्जिंगच्या माध्यमातून देखील चोरता येतो तुमचा डेटा अन् पैसे; काय आहे 'ज्युस जॅकिंग' स्कॅम?

मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स ही ट्रिक वापरतात..

Sudesh

बऱ्याच वेळा आपण घरातून बाहेर असताना आपल्या फोनची बॅटरी संपते. अशा वेळी मिळेल तिथून फोन चार्ज करण्याला आपण प्राधान्य देतो. प्रवास करताना तर सार्वजनिक ठिकाणी असणारे चार्जिंग पोर्ट आपण बिनदिक्कत वापरतो. मात्र, या माध्यमातून देखील तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो.

जसं जसं तंत्रज्ञान प्रगती करत आहेत, तसं-तसं स्कॅमर्स देखील लोकांना फसवण्याच्या नवनवीन पद्धती शोधत आहेत. 'ज्यूस जॅकिंग' स्कॅमही असाच एक प्रकार आहे. फोन किंवा लॅपटॉपला चार्ज करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वीजेला 'ज्युस' म्हटलं जातं. तर, हायजॅकिंग हा शब्द तर सर्वांना माहितीच आहे. त्यामुळेच चार्जिंगच्या माध्यमातून डेटा चोरी करणे या प्रकाराला 'ज्युस जॅकिंग' असं नाव पडलं आहे. (juice Jacking Scam)

कशी होते चोरी?

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, की चार्जिंगच्या वायरचा वापर करून आपण डेटा ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच, मोबाईलच्या चार्जिंग पोर्टमधून डेटाची देवाण-घेवाण होऊ शकते. हॅकर्स याचाच वापर लोकांच्या मोबाईलमध्ये मालवेअर सोडण्यासाठी करतात. हा मालवेअर पुढे मोबाईलमधील ईमेल, एसएमएस, सेव्ह केलेले पासवर्ड, फोटो अशी माहिती चोरून आपल्या डेटाबेसला पाठवतो.

असा रचला जातो सापळा

हॅकर्स या स्कॅमसाठी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग पोर्टची मदत घेतात. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, हॉटेल किंवा अशाच अन्य ठिकाणी असलेल्या चार्जिंग स्टेशनला ते टार्गेट करतात. या चार्जिंग स्टेशनमध्ये ते आपलं मालवेअर इन्स्टॉल करतात.

यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती त्याठिकाणी आपला फोन, लॅपटॉप किंवा अन्य डिव्हाईस चार्जिंगला लावते, तेव्हा त्यातील मालवेअर या डिव्हाईसमध्ये जातं. यामुळे यूजर्सच्या नकळत त्यांचं डिव्हाईस हॅक केलं जातं. हॅक करुन मिळवलेल्या माहितीचा वापर करून यूजर्स बँक पासवर्ड, ओटीपी, यूपीआय पिन अशा गोष्टी मिळवू शकतात. ज्यामुळे तुमचं बँक खातंही रिकामं करता येऊ शकतं.

काही मालवेअर अशा प्रकारे काम करतात, की जोपर्यंत ते डिव्हाईस चार्ज होत आहे तोपर्यंतच हॅकर्स डेटा ट्रान्सफर करू शकतात. मात्र, काही मालवेअर असेही आहेत, ज्यामध्ये यूजरच्या मोबाईलचा पूर्ण ताबा हॅकरकडे जातो. म्हणजेच, चार्जिंगवरुन काढल्यानंतरही हॅकर्स त्या व्यक्तीच्या मोबाईलमधील डेटा पाहू शकतात.

अशी घ्या खबरदारी

  • या स्कॅमपासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी असलेले चार्जिंग पोर्ट न वापरणं.

  • शक्यतो सोबत एखादी पॉवर बँक बाळगा. जेणेकरून तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी असलेले चार्जिंग पोर्ट वापरावे लागणार नाहीत.

  • डिव्हाईसमधील विविध अ‍ॅप्सना पासवर्ड लावा. मोबाईलमधील फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा पासवर्ड ऑन करून ठेवा.

  • सार्वजनिक ठिकाणी असलेले वायफाय वापरणं टाळा. या माध्यमातून देखील स्पायवेअर किंवा मालवेअर मोबाईलमध्ये येऊ शकतात.

  • तुमच्या डिव्हाईसमधील सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत रहा. कंपन्या आपल्या अपडेटेड सॉफ्टवेअरमध्ये नवीन अँटीव्हायरस देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT