June 2025 Upcoming Bike Launch esakal
विज्ञान-तंत्र

June 2025 Bike Launch : बाईकप्रेमींसाठी पर्वणी! जूनमध्ये लाँच होणार ‘या’ 4 दमदार दुचाकी गाड्या, एकदा बघाच

June 2025 Upcoming Bike Launch : जून 2025 मध्ये अनेक आकर्षक व दमदार दुचाकी भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरपासून अॅडव्हेंचर व स्पोर्ट्स बाईकपर्यंत भन्नाट पर्याय तयार आहेत

Saisimran Ghashi

Bike Launch Update : जून 2025 महिना देशभरात हवामानाच्या विविध रूपांमुळे चर्चेत असतानाच, बाईक प्रेमींसाठी मात्र या महिन्यात जबरदस्त उत्साह निर्माण झाला आहे. एकीकडे देशाच्या काही भागांत जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे दिल्ली एनसीआरमध्ये धुळीचे वादळ सुरू आहे. अशा या बदलत्या हवामानात बाईकप्रेमींसाठी दिलासादायक बातमी आहे जूनमध्ये अनेक बहुप्रतीक्षित दुचाकी बाजारात दाखल होणार आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरपासून अॅडव्हेंचर बाईक आणि अपडेटेड स्पोर्ट्स बाईकपर्यंत एकापेक्षा एक भन्नाट दुचाकींचे आगमन होणार आहे.

1. Suzuki e-Access

सुझुकीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘e-Access’ सादर केली होती, जी याच महिन्यात अधिकृतपणे लाँच होणार आहे. 3.07 kWh क्षमतेची बॅटरी आणि 4.1 kW मोटरसह ही स्कूटर 15 Nm टॉर्क जनरेट करते. 95 किमी पर्यंतची रेंज आणि 71 किमी/तास टॉप स्पीड यामुळे ही स्कूटर शहरांतील वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे. 0 ते 80% चार्जिंगसाठी केवळ 4 तास 30 मिनिटे लागतात. यात 4.2 इंच TFT डिस्प्ले, 17 लिटर अंडर-सीट स्टोरेज आणि Ride A, Ride B आणि Eco असे तीन रायडिंग मोड्स आहेत.

2. 2025 Yezdi Adventure

येसदी कंपनीने आपली 2025 मध्ये येणारी नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक 3 जून रोजी लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. पूर्वी ही बाईक 15 मे रोजी लाँच होणार होती, पण सीमावर्ती तणावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. 334cc लिक्विड-कूल्ड इंजिन, 29.2 bhp पॉवर आणि 29.8 Nm टॉर्क, तसेच 6-स्पीड गिअरबॉक्स ही बाईक दमदार परफॉर्मन्स देते. यामध्ये Rain, Road आणि Offroad असे तीन राइडिंग मोड्स, ड्युअल चॅनल ABS, USB चार्जर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखी सुविधा आहे.

3. 2025 Honda XL750 Transalp

जपानी कंपनी Honda ने त्यांच्या बहुप्रतीक्षित XL750 Transalp बाईकची किंमत आधीच जाहीर केली आहे 11 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरुवात. ही बाईक 90.5 bhp पॉवर आणि 75 Nm टॉर्क निर्माण करणाऱ्या 755cc ट्विन सिलिंडर इंजिनसह येते. यात 5 इंच TFT डिजिटल कन्सोल, ड्युअल चॅनल ABS, एलईडी हेडलाइट्स, 212 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 250 मिमी सीट हाइट आहे. बाईक बुक करण्यासाठी फक्त 1 लाख रुपयांचे बुकिंग अमाउंट भरावे लागेल

4. 2025 Kawasaki Z900

भारतामध्ये गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक विकली गेलेली बडी बाईक Kawasaki Z900 आता नव्या अवतारात भारतात येत आहे. 948cc लिक्विड कूल्ड इंजिन, 122 bhp पॉवर, 97.4 Nm टॉर्क, आणि 6 स्पीड गिअरबॉक्स यामुळे ही बाईक परफॉर्मन्सच्या बाबतीत एकदम पुढे आहे. नवीन Z900 मध्ये 5 इंच TFT डिस्प्ले, 300mm फ्रंट आणि 250mm रियर डिस्क ब्रेक आहेत. ही बाईक स्टँडर्ड आणि परफॉर्मन्स अशा दोन ट्रिम्समध्ये आणि तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या जून महिन्यात येणाऱ्या या नवनवीन दुचाकी मॉडेल्समुळे मार्केटमध्ये जबरदस्त स्पर्धा निर्माण होणार आहे. जर तुम्ही नवीन दुचाकी घेण्याचा विचार करत असाल, तर या लाँचेसनंतर निर्णय घेतल्यास तुमच्याकडे अधिक पर्याय आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बाईक मिळू शकते.

नावीन्य, परफॉर्मन्स आणि टेक्नोलॉजी या सगळ्यांचा अनुभव घेण्यासाठी या जुनमध्ये बाईक शोरूमला भेट द्यायलाच विसरू नका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: प्लेइंग इलेव्हन नीट पाहा! भारताच्या ५९३ कसोटीत जे घडलं नाही, ते मँचेस्टर सामन्यात घडतंय; सारेच चक्रावले

2029 ची निवडणूक जिंकण्याचा रस्ता म्हणजे जात; 'या' मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी, राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री?

Latest Maharashtra News Updates : मिरजेतील मुकबधीर शाळेत राज्यातील पहिली कर्णबधिरांसाठी रोबोटिक्स कार्यशाळा पडली पार

कार्पेंटर मला म्हणाला भाऊ को ऍडमिट किया हैं... लेकीने सांगितला राजा गोसावींच्या निधनाचा तो दिवस; म्हणाल्या- ते शेवटपर्यंत माझी वाट पाहत होते पण...

Stock Market Closing: सेन्सेक्स 540 अंकांच्या वाढीसह बंद; शेअ बाजार का वाढला? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT