kids aadhar card 
विज्ञान-तंत्र

Aadhar Card News : निळं आधार कार्ड कोणाला मिळतं जाणून घ्या!

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय नागरिकांची ओळख झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

आधार कार्ड ही आता प्रत्येक भारतीय लोकांची ओळख झाली आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा पासपोर्ट काढायचा असेल तर ते आधार कार्ड (Aadhar Card) लागतेच. आधारवर लिहिलेला १२ अंकी नंबर वगळता सर्वांचे आधार कार्ड सारखेच आहे. पण, UIDAI ने मुलांसाठी सुरू केलेल्या आधार कार्डचा रंग निळा ठेवला आहे.

५ वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठी UIDAI बाल आधार कार्ड तयार करते. इतर आधार कार्डप्रमाणेच त्याची रचना असते. पण त्याचा रंग निळा असतो. कोणीही पालक वैध कागदपत्रे देऊन आपल्या मुलांचे आधार कार्ड मिळवू शकतात. . UIDAI आधार बनवण्यासाठी 31 प्रकारचे ओळख पुरावे, 44 प्रकारचे पत्त्याचे पुरावे, १४ प्रकारचे नातेसंबंधाचे पुरावे आणि १४ प्रकारचे जन्म प्रमाणपत्र स्विकारते. तुम्हालाही जर मुलांसाठी आधार कार्ड बनवायचे असेल, तर तुम्ही या कागदपत्रांसह UIDAI च्या वैध केंद्रांवर अर्ज करू शकता.

Aadhar-Card

मुलांच्या आधारकार्डविषयक महत्वाच्या गोष्टी

-मुलाने वयाची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर आपोआपच हे कार्ड अवैध होईल.

-आधार कार्ड तयार करण्यासाठी मुलाच्या शाळेचा आयडी वापरला जाऊ शकतो.

-मुलाच्या वयाची ५ वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचा biometric Aadhaar data अपडेट करावे. १५ वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा ते अपडेट करणे गरजेचे आहे.

-मुलांचे आधारकार्ड तयार करण्यासाठी जन्म दाखला किंवा रूग्णालयातून मिळालेली डिस्चार्ड स्लिप पुरेशी आहे.

-पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे आधार कार्डमध्ये बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन केले जात नाहीत.

-UIDAI द्वारे ज्येष्ठांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग लहान मुलांपेक्षा वेगळा असतो. पाच वर्षांनंतर ते अपडेट करणे आवश्यक आहे, कारण पाच वर्षांनंतर मुलांचे आधार कार्ड अवैध ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT