kia ev6 electric crossover official india launch on june 2 check details  
विज्ञान-तंत्र

लवकरच Kia भारतात लाँच करणार खास इलेक्ट्रीक कार, पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Kia India 2 जून रोजी आपले नवीन इलेक्ट्रिक वाहन EV6 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. कंपनी 26 मे रोजी या इलेक्ट्रिक क्रॉसओवरसाठी प्री-बुकिंग सुरू करेल, तर किमतीच्या घोषणेनंतर पुढील महिन्यात डिलीव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. Kia ने नुकतीच आपली चौथी कार देशात लॉन्च केली होती, त्यानंतर कंपनी आता या वर्षातील दुसरी मोठी कार लॉन्च करणार आहे.

Kia EV6 हे ग्लोबल ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. Kia EV6 जागतिक स्तरावर 58kWh युनिट आणि 77.4kWh युनिट असलेल्या दोन बॅटरी पॅकसह सादर करण्यात आली आहे. त्याची बेस ट्रिम ही RWD व्हर्जन असेल जी 225bhp आणि 350Nm टॉर्क जनर्ट करेल. तर टॉप-एंड ट्रिम ही AWD व्हर्जन असेल जी 345bhp आणि 605Nm टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक कार पाच रंगांच्या पर्यायांसह सादर केली जाईल.

Kia EV6 मध्ये LED हेडलॅम्प, 19-इंच अलॉय व्हील, LED टेललाइट्स, मागील बंपर आणि शार्क-फिन अँटेना यांसारखी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. 2022 Kia EV6 ला 12.3-इंच स्क्रीन, इलेक्ट्रिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स, ड्राइव्ह मोड्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, यूव्ही-कट ग्लास आणि ऑटो-होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT