Kia EV6  esakal
विज्ञान-तंत्र

Kia EV6 : इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करत असाल तर किआ ईव्ही 6 ठरेल बेस्ट ऑप्शन

सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली

सकाळ डिजिटल टीम

Kia EV6 : सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली. त्यामुळे अनेक वाहन कंपन्यादेखील इलेक्ट्रीक वाहन बनवण्याच्या मागे लागलीत. आता किआची ईव्ही 6 (Kia EV6 ) ही कार बाजारात आलीय.

ही कार ऑडी क्यू5, (Audi Q5) ऑडी ए6, (Audi A6) वॉल्वो एक्ससी40, (Volvo XC40) वॉल्वो एक्ससी60 (Volvo XC60) वॉल्वो एक्ससी40 (Volvo XC40 ) रीचार्ज, (Recharge) बीएमडब्लू एक्स3, (BMW X3) मर्सिडीज-बेंज जीएलई (Mercedes-Benz GLE) या कारला टक्कर देत आहे.

किआ ईव्ही 6 (Kia EV6) च्या मागणीमुळे पुन्हा एकदा किआचं बुकींग सुरु झालं आहे. त्यामुळे तुम्ही NCAP मध्ये किआला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालं होत. खरं तर किआ कारला फक्त 100 युनिट विकायचे होते, मात्र कंपनीला 432 कारच बुकींग मिळलं. किआ ईव्ही 6 ची क्रेझ पाहता कंपनीला पुन्हा एकदा बुकींग सुरु करावं लागलं.

किआ ईव्ही 6 (Kia EV6) ही कार किआ ईवी 6 डिजाइन ई-जीएमपी ( E-GMP) प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. ही कार पाच रंगामध्ये बुक करता येऊ शकते. याशिवाय या स्लीक ग्रिल, (Sleek grille) डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स (LED headlights with DRL) आणि रेक्ड विंडशील्ड, (Raked windshield) तर कारच्या बाजूला ब्लॅक-आउट पिलर, इंडिकेटर-माउंटेड ORVM सह 19-इंच अलॉय व्हील (Alloy wheels) देखील आहेत.

Kia EV6 77.4kWh च्या सिंगल पॉवर ट्रेनसह दोन प्रकारांमध्ये बुक केले जाऊ शकते. ज्याची ARAI प्रमाणित श्रेणी 708 किमी आहे. ज्यामध्ये पहिला, रियर व्हील ड्राइव्ह प्रकार जो यास 229bhp ची पॉवर आहे. आणि 350Nm चा टॉर्क देतो. दुसरा ऑल व्हील ड्राइव्ह जो 229bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करतो. ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 5.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडण्यास सक्षम आहे आणि तिचा सर्वाधिक वेग 192 किमी/तास आहे.

या इलेक्ट्रिक कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट,अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, ADAS वैशिष्ट्ये सर्व व्हील डिस्क आहे.

ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, वाहन स्थिरता व्यवस्थापन, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल तसेच स्मार्ट पॉवर टेलगेट आहे. या कारची किंमत 60.95 लाख रुपये आहे आणि तिच्या ऑल व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 65.95 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT