Kia Seltos Facelift vs Hyundai Creta eSakal
विज्ञान-तंत्र

Kia Seltos Facelift vs Hyundai Creta: सेल्टॉस फेसलिफ्ट की क्रेटा, तुमच्यासाठी कोणती कार आहे बेस्ट? पाहा फीचर्स अन् किंमत

किया सेल्टॉस फेसलिफ्टसाठी बुकिंग 14 जुलैपासून सुरू झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

KIA Seltos vs Hyundai Creta : Kia India ने आपल्या Seltos या मध्यम आकाराच्या SUV कारचं फेसलिफ्ट मॉडेल सादर केलं आहे. यामध्ये जुन्या सेल्टॉसच्या तुलनेत अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन सेल्टॉस फेसलिफ्टसाठी बुकिंग 14 जुलैपासून सुरू झालं आहे, आणि पुढील महिन्यात किंमती जाहीर केल्या जातील.

कियाची ही गाडी आपल्या सेगमेंटमधील क्रेटा गाडीला चांगलीच टक्कर देणार आहे. तुम्हीदेखील या दोन्हीपैकी एक गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नवीन किया सेल्टॉस फेसलिफ्ट आणि त्याची कट्टर प्रतिस्पर्धी ह्युंदाई क्रेटा या दोन्ही गाड्यांची फीचर्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुमच्यासाठी योग्य गाडी कोणती याचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल. (KIA Seltos features)

इंजिन आणि गिअरबॉक्स

2023 Kia Seltos आणि Hyundai Creta या दोन्ही गाड्यांमध्ये 113bhp 1.5-लिटर नॅचरल-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 113bhp 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. मात्र, फेसलिफ्ट सेल्टॉसमध्ये नवीन 158 Bhp 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील देण्यात आलं आहे. या रेंजमधील सर्वात शक्तिशाली SUV मध्ये असं इंजिन दिलं जातं. कंपनी या इंजिनवर अवलंबून असणारे MT, iMT, AT, IVT आणि DCT असे एकूण पाच ट्रान्समिशन पर्याय देत आहे. (Kia seltos facelift features)

फीचर्स आणि सेफ्टी

किआ सेल्टॉस आणि ह्युंदाई क्रेटामध्ये बरेच चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन फेसलिफ्टेड सेल्टोसमध्ये दिलेल्या फीचर्समुळे या सेगमेंटची सिरीज एका नव्या लेव्हलला जाते. यात दोन 10.25-इंच युनिट्ससह ट्विन-स्क्रीन सेट-अप आहे. यातील एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आणि दुसरा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी आहे. (Car news)

यात नवीन पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, स्टँडर्ड सिक्स एअरबॅग्ज, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, लेव्हल-2 ADAS आणि बरेच फीचर्स मिळतात. क्रेटाच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये असे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

भारतात किंमत

सध्या क्रेटा गाडीची किंमत 10.87 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19.20 लाखांपर्यंत जाते. तर Kia Seltos Facelift ची किंमत 10.89 लाख ते 19.99 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. 2023 किआ सेल्टोस तीन अवतारांमध्ये सादर केली जाईल. टेक लाइन, जीटी लाइन आणि एक्स-लाइन. टॉप-स्पेक मॉडेल मध्ये नवीन वैशिष्ट्यांची एक लांबलचक यादी मिळेल ज्यामुळे त्याची किंमत मागील मॉडेलपेक्षा जास्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT