Kinetic dx and dx plus electric scooters Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Kinetic Scooter : काइनेटिक DX आणि DX+ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त..

काइनेटिकने DX आणि DX+ इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात लाँच केल्या असून यामध्ये स्मार्ट फीचर्स, दमदार बॅटरी आणि आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे

Saisimran Ghashi

  • काइनेटिक DX ही एक आधुनिक, स्मार्ट आणि दमदार इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

  • DX+ मध्ये अॅडव्हान्स फीचर्ससह 116 किमीची रेंज आणि स्मार्ट मोबाईल अॅप इंटिग्रेशन आहे.

  • मर्यादित युनिट्ससाठी बुकिंग सुरु असून डिलिव्हरी सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.

भारतीय वाहन बाजारात काइनेटिकने आपली नविन DX आणि DX+ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करून जोरदार पुनरागमन केलं आहे. 1.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आलेली ही स्कूटर जुना काइनेटिक ZX चा आधुनिक अवतार मानली जात आहे. नवे डिझाइन, सुधारित फिचर्स आणि दमदार परफॉर्मन्ससह ही स्कूटर खूप चर्चेत आली आहे.

कंपनीने काइनेटिक EV च्या अधिकृत वेबसाईटवर केवळ 1000 रुपयेच्या टोकन रकमेतून बुकिंग सुरू केलं आहे. मात्र बुकिंगची संख्या मर्यादित फक्त 35000 युनिट्स असून डिलिव्हरी सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

  • काइनेटिक DX ला Range-X निर्मित 2.6 kWh बॅटरी पॅक मिळतो, जो इतर NMC बॅटरींच्या तुलनेत चारपट अधिक आयुष्य (2500 ते 3500+ चार्ज सायकल्स) देतो.

  • DX+ वर्जनची IDC रेंज अंदाजे 116 किमी पर्यंत असल्याचा दावा करण्यात येतो.

  • या स्कूटरमध्ये तीन राईडिंग मोड्स Range, Power आणि Turbo दिले गेले आहेत.

  • कमाल वेग 90 किमी/तास पर्यंत जाण्याची क्षमता यात आहे.

डिझाईन आणि हार्डवेअर

  • जुन्या काइनेटिक ZX पासून प्रेरित असलेलं परंतु आधुनिक लुक असलेलं डिझाइन

  • LED DRLसह स्पोर्टी LED हेडलॅम्प्स

  • मजबूत मेटल बॉडी आणि प्रशस्त फ्लोअरबोर्ड

  • 37 लिटर अंडरसीट स्टोरेज, जे एक फुल आणि एक हाफ हेल्मेट सहज ठेवू शकते

  • 220mm फ्रंट डिस्क आणि 130mm रियर ड्रम ब्रेक्स, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसह

फिचर्स

  • 8.8 इंच डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर

  • ब्लूटूथ-सक्षम Kinetic Assist स्विच CRM शी थेट कनेक्ट

  • म्युझिक आणि व्हॉईस नेव्हिगेशनसाठी बिल्ट इन स्पीकर

  • Cruise Control फिचर

  • DX+ मध्ये विशेष Telekinetic फीचर्स

    • रिअल-टाईम व्हेईकल डेटा आणि राईड स्टॅट्स

    • Geo-fencing, Intruder Alert, Find/Track My Kinetic वगैरे

रंग

  • DX+ लाल, निळा, पांढरा, सिल्व्हर, आणि काळा

  • DX फक्त सिल्व्हर आणि काळा

किंमत

  • Kinetic DX किंमत 1,11,499 रुपये (एक्स-शोरूम)

  • Kinetic DX+ किंमत 1,17,499 रुपये (एक्स-शोरूम)

FAQs

1. What is the price of the Kinetic DX and DX+ scooters?
काइनेटिक DX ची किंमत 1,11,499 रुपये तर DX+ ची किंमत 1,17,499 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

2. What is the battery range of the Kinetic DX+ variant?
DX+ मध्ये Range-X निर्मित बॅटरी असून ती अंदाजे 116 किमीची रेंज देते.

3. What are the color options available?
DX मध्ये सिल्व्हर आणि काळा रंग तर DX+ मध्ये लाल, निळा, पांढरा, सिल्व्हर व काळा रंग उपलब्ध आहेत.

4. When will deliveries begin for the scooters?
या स्कूटर्सच्या डिलिव्हरी सप्टेंबर 2025 पासून सुरू होतील.

5. What are some key smart features of the DX+?
DX+ मध्ये क्रूझ कंट्रोल, रिअल टाईम ट्रॅकिंग, Geo-fencing, आणि Find My Kinetic यांसारखी स्मार्ट फीचर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT