Kinetic Luna Sakal
विज्ञान-तंत्र

Kinetic Luna: जुन्या आठवणी होणार ताज्या! ५० वर्षांनंतर नवीन अवतारात येणार 'ही' लोकप्रिय गाडी

८०च्या दशकातील लोकप्रिय मोपेड काइनेटिक लूना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. काइनेटिक ग्रुप या लोकप्रिय मोडेलला इलेक्ट्रिक अवतारात लाँच करणार आहे.

, सकाळ डिजिटल टीम

Kinetic Luna Electric Launch Soon: ८०च्या दशकातील लोकप्रिय मोपेड काइनेटिक लूना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. काइनेटिक ग्रुप या लोकप्रिय मोपेडला इलेक्ट्रिक अवतारात लाँच करणार आहे. कंपनीने माहिती दिली की, ई-लूनाला लवकरच काइनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सॉल्यूशन्सद्वारे लाँच केले जाईल. काइनेटिक इंजिनिअरिंगद्वारे करण्यात आलेल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती समोर आली आहे.

काइनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडने (केईएल) इलेक्ट्रिक मॉडेलसाठी चेसिस आणि अन्य गोष्टींचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनी मुख्य स्टँड, साइड स्टँड, स्विंग आर्मसह इतर प्रोडक्शन देखील सुरू केले आहे. सुरुवातीला ५ हजार यूनिट्सची निर्मिती करण्याची कंपनीची योजना आहे.

केईएलचे मॅनेजिंग डायरेक्टर अजिंक्य फिरोदिया यांनी माहिती दिली की, आम्हाला आशा आहे की २-३ वर्षात या व्यवसायात वर्षाला ३० कोटी रुपयांची वाढ होईल. याद्वारे केईएलला ईव्ही सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण होण्यास मदत होईल. कंपनीने एकेकाळी लूनाच्या दररोज २ हजारांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री आहे. नवीन अवतारात लाँच झाल्यानंतर देखील अशीच कामगिरी करेल, अशी आशा आहे.

फिरोदिया पुढे म्हणाले की, 'केईएल इलेक्ट्रिक टू आणि थ्री व्हीलर वाहनांसाठी सर्व प्रमुख मॅकेनिकल सब-असेंबलीसाठी वन-स्टॉप शॉप म्हणून पुढे येत आहे. मागील १२ महिन्यात आम्ही यात मोठी वृद्धी होताना पाहिले आहे.' केईएलने ५० वर्षांपूर्वी पहिले लूना मॉडेल लाँच केले होते. त्यावेळी या गाडीची किंमत फक्त २ हजार रुपये होती.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

८० च्या दशकात लूना एक लोकप्रिय मोपेड मॉडेल होते. बाजारात या गाडीची जवळपास ९५ टक्के हिस्सेदारी होती. यावरूनच मोपेडची लोकप्रियता लक्षात येते. दरम्यान, कंपनीने माहिती दिली की अहमदनगर येथील कंपनीच्या कारखान्यात गाडीचे उत्पादन सुरू झाले आहे.

हेही वाचा: WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद, 'या' ४९ फोन्समध्ये काम करणार नाही; पाहा संपूर्ण लिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT