UPI Sakal
विज्ञान-तंत्र

Online Payment: UPI वरून चुकीच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले पैसे? रिफंडसाठी फॉलो करा ही प्रोसेस

यूपीआय पेमेंटचे प्रमाण एवढे वाढले आहे की, अनेकदा चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. मात्र, चुकीच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे तुम्ही सहज परत मिळवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Wrong UPI Transaction Complaint: प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज मोबाइल नंबर, क्यूआर कोड, बँक खाते इत्यादींचा वापर करून कोणालाही पैसे पाठवता येतात. यूपीआय पेमेंटचे प्रमाण एवढे वाढले आहे की, अनेकदा चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. तुम्ही देखील चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले असल्यास काळजी करू नका. हे पैसे परत मिळवण्यासाठी सोपी पद्धत उपलब्ध आहे. याविषयी जाणून घेऊया.

NPCI हे मोबाइल नंबर आणि क्यूआर कोडचा वापर करून पैसे सहज ट्रान्सफर होईल, हे निर्धारित करते. यूजर BHIM, GPay, PhonePe सारख्या यूपीआय अ‍ॅपचा वापर करून कोणालाही पैसे पाठवू शकतात. या अ‍ॅप्समध्ये कोणाला पैसे पाठवत आहोत, हे पाहण्याची संपूर्ण सुविधा मिळते. बँक खाते, व्यक्तीचे नाव इत्यादी सर्व माहिती स्क्रीनवर दिसत असते. त्यामुळे कोणालाही पैसे पाठवण्याआधी दोनदा पाहणे, तुमच्या फायद्याचे ठरेल.

UPI अ‍ॅप सपोर्टशी करा संपर्क

आरबीआयच्या नियमांनुसार, चुकीच्या बँक खात्यात पैसे गेले असल्यास यूजरला सर्वातआधी त्याबाबत रिपोर्ट करावा लागेल. GPay, PhonePe, Paytm सारख्या अ‍ॅप्सच्या कस्टमर केअर सपोर्टला कॉल करून तुम्ही याबाबत माहिती देऊ शकता. तुम्ही त्यांच्याकडून पैसे परत मिळवण्याच्या पद्धतीविषयी जाणून घेऊ शकता.

एनपीसीआय पोर्टलवर करा तक्रार

  • तुम्हाला जर यूपीआय अ‍ॅप कस्टमर केअरकडून सपोर्ट न मिळाल्यास NPCI पोर्टलवर जाऊन तक्रार करू शकता.

  • यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम npci.org.in या वेबसाइटवर जावे लागेल.

  • येथे 'व्हाट व्ही डू टॅब'वर क्लिक करा.

  • आता यूपीआय पर्यायावर टॅप करा.

  • त्यानंतर Dispute Redressal Mechanism वर क्लिक करा.

  • पुढे तुम्हाला तक्रार करताना यूपीआय आयडी, पेमेंट केलेले बँक अकाउंट, रक्कम, तारीख, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल.

  • तक्रारीचे कारण Incorrectly transferred to another account निवडून सबमिट करा.

बँकेशी करा संपर्क

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला ठराविक कागदपत्रं, फॉर्म भरून द्यावा लागेल. त्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे पुन्हा जमा होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT