electricity bill Sakal
विज्ञान-तंत्र

Electricity Bill: घरातील 'हे' दोन डिव्हाइस त्वरित बदला, वीज बिल येईल निम्म्यापेक्षा कमी

हिवाळ्यात गिझर, हीटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे वीज बिल जास्त येते. मात्र, तुम्ही सोप्या ट्रिकने वीज बिल कमी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Simple ways to reduce your electricity bill: हिवाळ्यात सर्वसाधारणपणे वीज जास्त येत असते. वीज बिलात वाढ झाल्याने टेन्शन तर येतेच, सोबत महिन्याचे बजेट देखील बिघडते. घरात दिवसभर फ्रीज, पंखा, कूलर, बल्ब, कॉम्प्युटर, टीव्ही अशा अनेक गोष्टी सुरू असतात, त्यामुळे वीज बिल जास्त येण्याची शक्यता असते.

तुम्ही देखील घराचे वीज बिल कमी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला यासाठी सोपी पद्धत सांगणार आहोत. घरातील दोन डिव्हाइसमध्ये बदल करून तुम्ही वीज बिल सहज कमी करू शकता. याविषयी जाणून घेऊया.

गिझर बदला

तुम्हाला जर वीज बिल कमी करायचे असेल तर सर्वात प्रथम गिझरवर लक्ष द्या. कारण, हिवाळ्यात गिझरचा सर्वाधिक वापर केला जातो. वीज बिल कमी यावे यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक गिझरऐवजी गॅस गिझरचा वापर करू शकता. गॅस गिझरचे वैशिष्ट्ये म्हणजे यामुळे विजेचा वापर होणार नाही व पाणी देखील सहज गरम करता येईल. तुमच्या भागात वारंवार वीज जात असेल तर गॅस गिझरचा वापर करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

हीटर देखील बदला

हिवाळ्यात हीटरचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. थंडीपासून बचावासाठी बहुतांशवेळा हीटरचा वापर करतो. परंतु, हीटरच्या जास्त वापरामुळे वीज बिलात देखील वाढ होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही सोलर हीटरचा वापर करू शकता. सोलर हीटरचा वापर केल्यास तुमचे वीज बिल देखील खूपच कमी होईल. बाजारात खूपच कमी किंमतीत येणारे गिझर आणि हीटर उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT