Voter card Voter card
विज्ञान-तंत्र

मतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता, वाचा सोपी प्रोसेस

सकाळ डिजिटल टीम

मतदार ओळखपत्र हे भारतीय निवडणूक आयोगाने भारतीय नागरिकांना दिलेले ओळखपत्र असून हे भारतीय नागरिकांसाठी ओळखीचा पुरावा किंवा पत्ता पुरावा म्हणून देखील काम करतो. तसेच निवडणुकीदरम्यान मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. हे कार्ड फक्त मतदानासाठीच वैध नाही, तर अनेक सरकारी योजनांचा लाभ देखील या ओळखपत्राच्या आधारे दिला जातो. भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, मतदानासाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाकडे मतदार ओळखपत्र असू शकते.

विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि कोणत्याही कारणास्तव तुम्ही इतर ठिकाणी स्थलांतरित होणार असाल तर तुमच्या मतदार ओळखपत्रावरील पत्ता बदलायला विसरू नका. हा पत्ता बदलणे अगदी सोपे आहे आणि ते प्रकारे करता येत एक ऑफलाइन आणि घरबसल्या ऑनलाइन. तुम्हाला तुमचा पत्ता ऑफलाइन बदलायचा असल्यास, तुमच्या सध्याच्या पत्त्याच्या पुराव्यासह तुमच्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल.

ऑनलाइन मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • पहिल्यांदा तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल www.nvsp.in वर लॉग इन करावे लागेल

  • तुम्ही इतर कोणत्याही मतदारसंघात गेला असल्यास 'ऑनलाइन एप्लिकेशन फोर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर/ ट्रांसफर फ्रॉम AC टू AC' अंतर्गत फॉर्म 6 वर क्लिक करावे लागेल.

  • तुम्ही एकाच मतदारसंघातील एका ठिकाणहून दुसरीकडे स्थलांतरीत झाले असल्यास, फॉर्म 8A वर क्लिक करा.

  • येथे तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, मतदारसंघ, सध्याचा कायमचा पत्ता यासह सर्व आवश्यक तपशील भरा.

  • काही तपशील पर्यायी आहेत जसे की ईमेल एड्रेस आणि मोबाइल नंबर. ते देखील भरा.

  • फोटो, पत्त्याचा पुरावा आणि वयाच्या पुराव्यासह सर्व सहाय्यक कागदपत्रे अपलोड करा.

  • अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांसह फॉर्म ऑनलाइन सबमिट करा.

  • आता, डिक्लेरेशन ऑप्शन भरा आणि कॅप्चा एंटर करा.

  • सर्व तपशील व्हेरिफाय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT