know these gadgets will make your lifestyle healthy Marathi article 
विज्ञान-तंत्र

निरोगी जीवनशैलीसाठी हे गॅजेट्स करतील तुमची मदत, जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

मागच्या वर्षभरापासून कोरोना महामारीने जगभराच थैमान घातले आहे. या कठिण परिस्थीत आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येकाला निरोगी जीवनशैलीचे महत्व लक्षात येत आहे. त्यासाठी आपली मदत काही विषेश गॅझेट्स नक्की करु शकतात. आज आपण आपले आरोग्य आणि जीवनशैली निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी पडतील अशा गॅझेट्सबद्दल माहिती घेणार आहोत. 

स्मार्टवॉच

स्मार्टवॉचसारख्या अंगावर घालायला सोपे फिटनेस डिव्हाइस बर्‍याच लोकांसाठी महत्वाचे ठरत आहेत. आपल्या रोजच्या शारीरिक हालचालीची माहिती ठेवून आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे स्मार्टवॉच उपयोगी पडते. स्मार्टवॉच आपले दैनंदिन जीवन बऱ्यापैकी सोपे करते. याला तुम्ही आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता आणि सूचना, कॉल,  संदेश आणि बरेच काही यामध्येच वापरु शकता. अॅपल आणि सॅमसंग सारख्या ब्रँडमध्ये प्रिमिअम तसेच रीअलमी आणि मेझफिट सारख्या ब्रांड्स भारतातील काही सर्वोत्तम आणि स्वस्त स्मार्टवॉच आहेत. मेझफिटची आताच लॉंच झालेल्या GTR 2e आणि GTS 2e 24 तास हृदययाची गतीवर देखरेख, स्लीप ट्रॅकिंग, रक्तामध्ये ऑक्सिजन प्रमाण (एसपीओ 2) देखरेख आणि वास्तविक-वेळ तपमान मापन सारख्या काही वैशिष्ट्यांसह देण्यात आले आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी स्मार्ट वॉचमध्ये गुंतवणूक करणे उत्तम ठरेल. 

एयर प्यूरीफायर

जर आपण दिल्ली, मुंबई, बेंगलोर सारख्या महानगरात रहात असाल तर आपल्या घरासाठी एअर प्यूरिफायर एक अत्यावश्यक साधन आहे. एअर प्यूरिफायर्स आपल्या घरात हवा शुद्ध करण्यासाठी तसेच धूळ, धूर, वास हे दूर ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. हे उपकरण हवेतील प्रदूषकांमुले उद्भवणाऱ्या सर्व धोक्यांना निष्फळ ठरवते. विशिष्ट एलर्जी आणि श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

माइंडफुलनेस आणि वेलनेस अ‍ॅप्स

शारीरीक आरोग्यासोबतच चांगले मानसिक आरोग्य देखील तेवढेच महत्वाचे असते.  सध्याच्या वेगवान जीवनशैलीमुळे तरुण पिढीमध्ये तणाव आणि चिंता वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाला थोडासा निवांत वेळ काढून आराम घेण्याची आवश्यकता वाढली आहे. आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी  माइंडफुलनेस आणि वेलनेस मोबाइल अॅप्स मध्ये दररोज चिंतनाचे धडे दिले जातात. या अॅपमधून  मेडिटेशन, झोप आणि बरेच गोष्टींमध्ये मदत मिळते. 

स्मार्ट स्केल्स

स्मार्ट वेटिंग स्केल आपल्या वापरकर्त्यास ट्रॅक करते आणि आपल्या स्मार्टफोनमध्ये डेटा सिंक करुन आपल्याला आरोग्यबद्दल अनेक महात्वाचे सल्ले देत राहते. ही स्मार्ट स्केल आपले बीएमआय, हृदयाचे ठोके, शरीरातील चरबी, हाडांचे द्रव्यमान, शरीरातील पाणी आणि आरोग्याबद्दल इतर माहितीसह आपले वजन मोजते. 

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही स्केल अनेकजण वापरु शकतात.  आपल्याला फक्त प्रत्येक वापरकर्त्यासाठी स्वतंत्र प्रोफाइल तयार करणे आणि त्यानुसार डेटा संकालित करण्याची सेटिंग करावी लागेल.  काळानुसार तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना, या गॅझेट्सच्या नवीन आणि अधिक प्रगत आवृत्त्या येत राहतात. यांच्या मदतीन तुम्ही तुमचे आरोग्य व जीवनशैली नक्कीच चांगली राखू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT