Know tips for improving speed of WiFi at home Nagpur News  
विज्ञान-तंत्र

घरून काम करताय पण WiFi स्पीड देत नाहीये? मग हे उपाय करून बघाच; क्षणात होईल काम

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. काही महिन्यांसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. मात्र आता कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरु झालंय. जे लोकं वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना इंटरनेटची गरज निर्मण झाली आहे. यासाठी बहुतांश लोकांनी आपल्या घरी वायफाय बसवून घेतले असतील. मात्र या वायफायची स्पीड नेहमीच कमी जास्त होत असते. कधी कधी ऐन कामाच्या वेळी वायफाय बंद पडतं. त्यामुळे काम पूर्ण होऊ शकत नाही. मात्र आता घाबरू नका. वायफायच्या इंटरनेटची स्पीड वाढवण्यासाठी आम्ही काही उपाय तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं वायफाय कधीच हँग होणार नाही आणि उत्तम स्पीड देईल. चला तर मग जाणून घेऊया. 

 वायफायला किती डिव्हाइसेस कनेक्ट आहेत चेक करा 

जर तुमच्या वायफायची स्पीड अचानक कमी झाली असेल तर सुरुवातीला तुमच्या वायफायला किती डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत ते चेक करा. बरेचदा तुमच्या वायफायला पासवर्ड नसल्यामुळे अनेक डिव्हाइसेस तुमच्या वायफायला कनेक्ट होतात. यामुळे स्पीड कमी होते. त्यामुळे तुमच्या वायफायचा पासवर्ड सेट करून ठेवा आणि जास्त डिव्हाइसेस कनेक्ट होणार नाहीत याची काळजी घ्या. 

वायफाय रिबूट करा 

जर तुम्ही तुमच्या घरी वायफाय घेतलं असेल तर ते तुमच्या ऑफिसच्या वेळीच नाही तर संपूर्ण दिवस सुरु असतं. ज्यामुळे वायफाय गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या राउटरला काही वेळ बंद ठेवा किंवा दिवसभरातून एकदातरी रिबूट करा. यामुळे स्पीड वाढण्यास मदत होईल. 

वायफायची जागा महत्वाची 

जर तुमच्या घरी वायफायची जागा बरोबर नसेल तर तुमच्या वायफायची स्पीड कमी होऊ शकते. यासाठी तुमचं राउटर खोलीच्या कोपऱ्यात ठेऊ नका. राउटरला खोलीच्या मध्यभागी ठेवल्यास तुम्हाला चांगली स्पीड मिळू शकेल.   

तर असे काही उपाय करून बघा आणि तुमच्या वायफायची स्पीड वाढवा. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT