विज्ञान-तंत्र

Krish Arora IQ : १० वर्षाच्या पोराचा IQ आइन्स्टाईनपेक्षाही जास्त! कोण आहे हा भारतीय वंशाचा भिडू?

Krish Arora IQ Record Albert Einstein Stephen Hawking : १० वर्षीय भारतीय वंशाचा मुलगा क्रिश अरोरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने उच्च बुद्धिमत्ता गुण (IQ) मिळवून जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिन्स यांनाही मागे टाकले आहे.

Saisimran Ghashi

Krish Arora IQ Record : हाऊन्सलो, लंडन येथील १० वर्षीय भारतीय वंशाचा मुलगा क्रिश अरोरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने १६२ इतका उच्च बुद्धिमत्ता गुण (IQ) मिळवून जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिन्स यांनाही मागे टाकले आहे. या कामगिरीने त्याला मेंसा या जगातील अत्युच्च बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींच्या गटात प्रवेश मिळवून दिला आहे.

क्रिशने नुकतेच युकेतील प्रसिद्ध क्वीन एलिझाबेथ स्कूलमध्ये प्रवेश घेतला असून, तो शाळेत जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. क्रिशने आपल्या अभ्यासाबाबत सांगितले, "११-प्लस परीक्षा खूपच सोप्या होत्या. प्राथमिक शाळेत मला काही शिकायला मिळत नाही; फक्त गुणाकार आणि वाक्य लिहिण्याचा अभ्यास चालतो. मला मात्र अल्गेब्रा शिकायला आवडते."

क्रिशचे पालक मौली आणि निश्चल, हे दोघेही इंजिनियर आहेत. मौली यांनी सांगितले, "क्रिश फक्त चार वर्षांचा असताना त्याची बुद्धिमत्ता सामान्य मुलांपेक्षा खूपच पुढे असल्याचे जाणवले. त्याला वाचनात खूप रस होता, स्पेलिंग उत्कृष्ट होती, आणि गणिताची आवड व कौशल्यही अफाट होते. चार वर्षांचा होण्याआधीच त्याने माझ्यासोबत तीन तास बसून एक पूर्ण गणिताचे पुस्तक संपवले होते. तो तेव्हा दशांश विभागणी करीत होता."

क्रिशने वयाच्या आठव्या वर्षी एका दिवसात वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण केला. "त्याला जे काही करायचे असते, त्यात तो उत्कृष्ट आहे," असे त्याच्या आईने नमूद केले.

अभ्यासातील यशासोबतच क्रिश एक कुशल पियानोवादक देखील आहे. त्याने अवघ्या सहा महिन्यांत पियानोच्या चार ग्रेड उत्तीर्ण करत ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवले. सध्या त्याच्याकडे पियानोच्या सातव्या ग्रेडचे प्रमाणपत्र आहे.

क्रिशने पश्चिम लंडनमधील संगीत स्पर्धांमध्ये मोठ्या वयाच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत बक्षिसे जिंकली आहेत. तो कोणतेही संगीत तुकडे नोट्सशिवाय वाजवू शकतो. "स्पर्धांमध्ये वादन करताना मला घाबरायला होत नाही; मला माहिती आहे की मी चुकणार नाही," असे तो म्हणतो.

क्रिशला कोडी सोडवणे, क्रॉसवर्ड्स सोडवणे, आणि यंग शेल्डन हा टीव्ही शो पाहायला आवडतो. बुद्धिबळाच्या आवडीमुळे पालकांनी त्याला खास शिक्षक नेमले, मात्र सध्या कृष्ण त्यानाही हरवतो.

क्रिश अरोराच्या बुद्धिमत्ता आणि कलागुणांमुळे त्याचं नाव जागतिक स्तरावर चमकलं आहे. त्याच्या यशाने भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांना अभिमान वाटावा, असाच तो तरुण तेजस्वी मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT