KTM Bike
KTM Bike esakal
विज्ञान-तंत्र

KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

सकाळ डिजिटल टीम

KTM Bike : KTM ने भारतात 390 Adventure V बाईक लॉन्च केली आहे. 390 अॅडव्हेंचर आणि अॅडव्हेंचर एक्स मॉडेल कंपनीच्या लाइनअपमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहेत. आता त्यात एका नवीन बाईकची भर पडली आहे, जी खास लॉन्ग ड्राइव्ह साठी बनवली जाते.

बेस मॉडेलच्या तुलनेत मोटरसायकलला वेगळा सस्पेन्शन सेटअप आणि सीटची कमी उंची मिळते. त्यात एक आकर्षक डिझाइन आणि काही इलेक्ट्रॉनिक राइडिंग भाग जोडण्यात आले आहेत. नवीन प्रकारातील वैशिष्ट्ये आणि पॉवर परफॉर्मन्सबद्दल जाणून घ्या...

KTM 390 Adventure V चे डिझाइन

डिझाइनच्या बाबतीत ही नवीन बाईक तिच्या बेस मॉडेलसारखीच आहे. यात विंडशील्ड, अलॉय व्हील्स, वाढलेली इंधन टाकी, स्प्लिट स्टाइल सीट्स आणि ड्युअल स्पोर्ट टायर मिळतात. त्याची सीटची उंची 830 मिमी आहे.

KTM 390 Adventure V ची वैशिष्ट्ये

या मोटरसायकलमध्ये लाइटिंगसाठी एलईडी सेटअप देण्यात आला आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळेल, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

KTM 390 Adventure V इंजिन

या KTM बाइकमध्ये 373cc सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन असेल. हे 6 स्पीड गिअरबॉक्स आणि क्विक शिफ्टरशी जोडले जाईल. हा सेटअप एकूण 43hp पॉवर आणि 37Nm टॉर्क देईल.

सुरक्षिततेच्या दृष्टीने याला पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक मिळतात. याशिवाय बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस, वेगवेगळे रायडिंग मोड आणि ट्रॅक्शन कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचा सस्पेंशन सेटअप KTM 390 Duke सारखा आहे. याला पुढील बाजूस 43mm इनव्हर्टेड फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो शॉक ऍब्जॉर्बर मिळतो.

KTM 390 Adventure V किंमत

या नवीन बाईकची किंमत 3.39 लाख रुपये आहे. त्याचे मानक मॉडेल देखील त्याच किंमतीत येते. याशिवाय Adventure X मॉडेलची किंमत 2.81 लाख आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''पुढचे पंतप्रधान मोदी नव्हे तर अमित शाह'' केजरीवालांचं मोठं विधान; कारणही सांगितलं

Latest Marathi News Live Update: चाकण परिसरात जोदार पावसाला सुरुवात; अजित पवारांच्या सभेत पावसाचा व्यत्यय

RBI: धक्कादायक! टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रे केली परत, काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election 2024: जळगावमध्ये अपक्ष आमदाराचा स्वतः एकट्यानंचं प्रचार सुरु; व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Lok Sabha: रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला! अक्षयतृतीयेचा मुहूर्त फळाला; पाटील होणार प्रचारात सक्रिय

SCROLL FOR NEXT