Lava Storm Play and Lava Storm Lite mobile launch price features esakal
विज्ञान-तंत्र

Budget Mobile Launch : चीनला धोबीपछाड! भारतातील बड्या कंपनीने 7999 रुपयांत लाँच केला 5G स्मार्टफोन; दमदार फीचर्स एकदा बघाच

Lava Storm Play and Lava Storm Lite mobile launch price features : लावा कंपनीने ८ हजारांच्या खाली जबरदस्त फीचर्ससह दोन 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Saisimran Ghashi

Lava Mobile Launch : भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा (Lava) ने आपल्या ग्राहकांसाठी बजेट सेगमेंटमध्ये जबरदस्त फिचर्ससह दोन नवीन 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. Lava Storm Play आणि Lava Storm Lite या नावाने बाजारात आलेले हे दोन्ही स्मार्टफोन कमी किंमतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्याचं आश्वासन देतात. विशेष म्हणजे या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटीसारखी वैशिष्ट्ये असूनही त्यांची किंमत केवळ 8 हजार रुपयांच्या आत ठेवण्यात आली आहे.

भारतीय ब्रँडचा थेट चिनी कंपन्यांना धोबीपछाड

Realme, Redmi, Poco आणि Infinix यांसारख्या चिनी कंपन्यांच्या बजेट 5G स्मार्टफोनना टक्कर देण्यासाठी Lava ने आपली Storm सिरीज लाँच केली आहे. "मेड इन इंडिया" या टॅगसह येणारे हे फोन केवळ परदेशी पर्यायांना पर्याय नाहीत, तर अनेक बाबतीत त्यांना मागे टाकणारे ठरत आहेत.

फीचर्स

-Lava Storm Play

  • किंमत: 9,999 रुपये

  • RAM आणि स्टोरेज: 6GB RAM + 128GB स्टोरेज (6GB पर्यंत वर्च्युअल RAM)

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 7060 5G

  • डिस्प्ले: 6.75-इंच HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट

  • कॅमेरा: मागील 50MP + 2MP ड्युअल कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा

  • बॅटरी: 5000mAh, 18W फास्ट चार्जिंग

  • सुरक्षा व सुविधा: साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, IP64 वॉटर व डस्ट रेसिस्टन्स

  • सॉफ्टवेअर: Android 15 बेस्ड

-Lava Storm Lite

  • किंमत: 7,999 रुपये

  • RAM आणि स्टोरेज: 4GB RAM + 64GB / 128GB स्टोरेज (4GB पर्यंत वर्च्युअल RAM)

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 6400 ऑक्टा-कोर

  • डिस्प्ले: 6.75-इंच HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट

  • कॅमेरा: 50MP मागील कॅमेरा, 5MP सेल्फी कॅमेरा

  • बॅटरी: 5000mAh, 15W चार्जिंग

  • इतर फीचर्स: 5G सपोर्ट, USB Type-C, Android 15

उपलब्धता

  • Lava Storm Play: १९ जून रोजी दुपारी १२ वाजता Amazon वर विक्रीस उपलब्ध

  • Lava Storm Lite: २४ जून रोजी दुपारी १२ वाजता Amazon वर विक्रीस सुरू

ग्राहकांसाठी उत्तम पर्याय

सध्या 5G फोनसाठी मोठा खर्च करणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही, पण Lava ने अत्यंत किफायतशीर दरात प्रीमियम फिचर्स देत ग्राहकांसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. देशी ब्रँडकडून आलेली ही ऑफर निश्चितच मोबाईल मार्केटमध्ये जबरदस्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : कांदा दराच्या पडझडीवरून नाफेडचे अधिकारी धारेवर; राज्य सरकारची कडक भूमिका

Amit Shah : युवकांना अमली पदार्थांपासून वाचवा, गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन; कठोर दृष्टिकोन बाळगा

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Airport Jobs 2025: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! एअरपोर्टवर विविध पदांची भरती सुरु; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT