LG ने आणला 97 इंचाचा धमाकेदार OLED TV! जाणून घ्या फीचर्स
LG ने आणला 97 इंचाचा धमाकेदार OLED TV! जाणून घ्या फीचर्स Sakal
विज्ञान-तंत्र

LG ने आणला 97 इंचाचा धमाकेदार OLED TV! जाणून घ्या फीचर्स

सकाळ वृत्तसेवा

कंपनीने या इव्हेंटमध्ये सर्वात मोठे आणि सर्वात लहान आकाराचे OLED टीव्हींबाबतची माहिती जाहीर केली आहे.

OLED टीव्हीची श्रेणी वाढवत, LG ने CES 2022 मध्ये LG OLED G2 आणि C2 मालिका मार्केटमध्ये आणल्या आहेत. कंपनीने या इव्हेंटमध्ये सर्वात मोठे आणि सर्वात लहान आकाराचे OLED टीव्हींबाबतची माहिती जाहीर केली आहे. कंपनीचा सर्वात मोठा OLED टीव्ही 97 इंच आहे आणि तो कंपनीच्या नवीनतम G2 OLED टीव्ही मालिकेत लॉंच करण्यात आला आहे. नवीन टीव्हीमध्ये कंपनी वेबओएस सॉफ्टवेअरमध्ये (WebOS Software) मल्टी-यूजर प्रोफाइल्स सारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये देखील ऑफर करत आहे. जाणून घ्या त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती... (Learn about the features of LG's 97 inch OLED TV)

LG G2 मालिकेची वैशिष्ट्ये आणि तपशील

कंपनीचे हाय-एंड G2 मालिकेतील टीव्ही अतिशय स्लिम डिझाइनसह येतात. या मालिकेत 97 इंच, 55 इंच, 65 इंच, 77 इंच आणि 83 इंच आकाराचे टीव्ही सादर करण्यात आले आहेत. यामध्ये 120Hz 4K गेमिंग (Games) , व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि ऑटो लो-लेटेंसी मोडसह अनेक छान वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. याशिवाय, टीव्हीच्या या मालिकेत गेम डॅशबोर्ड देखील देत आहे. हे टीव्ही कंपनीच्या पाचव्या पिढीतील A9 प्रोसेसरवर काम करतात. या टीव्हीच्या किमती आणि उपलब्धतेबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

LG C2 OLED TV या मालिकेची वैशिष्ट्ये आणि तपशील

या मालिकेत 42-इंचाचा OLED टीव्ही देत कंपनीने हा सर्वात लहान आकाराचा OLED टीव्ही म्हणून सादर केला आहे. कंपनी या टीव्हीमध्ये सर्व प्रीमियम फीचर्स (Premium Features) देत आहे. HDMI 2.1 पोर्ट व्यतिरिक्त टीव्ही 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि अल्फा 9 Gen 5 प्रोसेसर 4K ऑफर करत आहे. टीव्हीमध्ये तुम्हाला एक चांगला गेम ऑप्टिमायझर मेनू पाहायला मिळेल, ज्यामुळे अंधाऱ्या खोलीत गेमिंग करताना डोळ्यांवर ताण येणार नाही.

याशिवाय कंपनी टीव्हीमध्ये FPS आणि RPG सारख्या स्पोर्टस गेमिंग वैशिष्ट्यांसह इतर गेम ऑप्टिमायझर प्रीसेट देखील ऑफर करत आहे. LG या टीव्हीसह Nvidia GSync, Nvidia GeForce, AMD FreeSync सह व्हेरिएबल रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देत आहे. या टीव्ही व्यतिरिक्त कंपनीने त्यांचे QNED LED टीव्ही देखील सादर केले आहेत. या मालिकेतील टीव्ही नवीन Alpha 9 Gen 5 प्रोसेसर आणि webOS 22 स्मार्ट टीव्ही OS वर काम करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT