Lenovo Tab P11 5G Sakal
विज्ञान-तंत्र

Lenovo Tab: 7700mAh बॅटरी, 8GB रॅमसह Lenovo चा शानदार टॅबलेट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

स्मार्टफोन ब्रँड लेनोवोने आपला पहिला प्रीमियम टॅबलेट Tab P11 5G ला भारतात लाँच केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lenovo Tab P11 5G Launched: स्मार्टफोन ब्रँड लेनोवोने आपला पहिला प्रीमियम टॅबलेट Lenovo Tab P11 5G ला भारतात लाँच केले आहे. या प्रीमियम टॅबची सुरुवाती किंमत २९,९९९ रुपये आहे. टॅबमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. यात Qualcomm Snapdragon ७५०G ५G प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. Lenovo Tab P11 5G च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Lenovo Tab P11 5G ची किंमत

टॅबच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजची किंमत २९,९९९ रुपये, ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपये आहे. टॅबलेट ऑनलाइन स्टोर आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर स्टॉर्म ग्रे, मून व्हाइट, मॉडर्निस्ट टेल रंगात उपलब्ध आहे.

हेही वाचा: SBI: वारंवार बँकेत जाण्याची गरजच नाही, WhatsApp च्या एका क्लिकवर होतील तुमची सर्व कामं

Lenovo Tab P11 5G चे स्पेसिफिकेशन

Lenovo Tab P11 5G मध्ये ११ इंच २के रिझॉल्यूशनसह येणारा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून, याची पीक ब्राइटनेस ४०० निट्स आहे. यात जेबीएलचे चार-स्पीकर दिले असून, जे डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतात.

लेनोवोचा हा टॅब क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७५०जी ५जी प्रोसेसरसह येतो. यात ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता.

Lenovo Tab P11 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर यामध्ये १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. कॅमेरा २एक्स झूम सपोर्टसह येतो. यात १० वॉट चार्जिंग सपोर्टसह येणारी ७७०० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT