ISRO IIT Somnath eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO : आयआयटीमधील एक टक्का विद्यार्थीही इस्रोमध्ये येत नाहीत, सोमनाथ यांनी व्यक्त केली खंत; सांगितलं गंभीर कारण

IIT Grads in ISRO : जगातील प्रमुख अवकाश संशोधन संस्थांमध्ये इस्रोची गणना होते.

Sudesh

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणं आणि आदित्य एल-1 मोहिमेचं यशस्वी लाँचिंग यामुळे इस्रो चांगलीच चर्चेत आहेत. मात्र, भारताच्या या अवकाश संशोधन संस्थेमध्ये IIT मधील एक टक्का विद्यार्थी देखील येत नसल्याचं समोर आलं आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी ही गोष्ट सांगितली आहे.

जगातील प्रमुख अवकाश संशोधन संस्थांमध्ये इस्रोची गणना होते. कित्येक कठीण स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडण्याचा विक्रम इस्रोच्या नावावर आहे. मात्र असं असतानाही आयआयटीमधील विद्यार्थी इस्रोमध्ये काम करण्यास तयार होत नाहीत, अशी खंत सोमनाथ यांनी व्यक्त केली.

भारतातील टॉप इंजिनिअर्स हे आयआयटीमधून बाहेर पडतात. मात्र, त्यांना इस्रोमध्ये काम करण्यात रस नाही. अवकाश संशोधन हे महत्त्वाचं क्षेत्र आहे असा विचार करणारे लोक इस्रोमध्ये येतात. मात्र, असा विचार करणारे एक टक्क्याहून कमी विद्यार्थी आहेत, असंही सोमनाथ यांनी सांगितलं. ते एशियानेट या वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते.

काय आहे कारण?

सोमनाथ यांनी सांगितलं, की याचं सगळ्यात मोठं कारण पगार हे आहे. यावेळी त्यांनी एक अनुभव देखील सांगितला. इस्रोची टीम एकदा कॅम्पस प्लेसमेंटसाठी आयआयटीमध्ये गेली होती. त्यावेळी इस्रोमधील संधी आणि कामाची पद्धत विद्यार्थ्यांनी ऐकून घेतली. मात्र, जेव्हा सॅलरी स्ट्रक्चर सांगण्यात आलं, तेव्हा तेथील निम्म्याहून अधिक विद्यार्थी उठून निघून गेले.

इस्रोमध्ये पगार किती?

मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, इस्रोमध्ये इंजिनिअर्सचा सुरुवातीचा पगार साधारणपणे 56,100 रुपये प्रति महिना एवढा आहे. तर इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांचा पगार 2.5 लाख रुपये महिना एवढा आहे.

आयआयटीमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी मिळणारा पगार हा इस्रोच्या चेअरमन यांच्या पगाराएवढा आहे. त्यामुळेच आयआयटीमधून बाहेर पडणारे विद्यार्थी इस्रोऐवजी दुसऱ्या देशातील एखादी मोठा पगार देणारी कंपनी निवडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Disruption : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-ठाणे लोकल रेल्वेसेवा खोळंबली, प्रवाशांचे प्रचंड हाल

Kolhapur Crime News : डॉक्टर मुलीने ७८ वर्षीय वडिलांना चावून बोटचं तोडलं, छातीवर लाथ मारली अन्; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

आनंदाची बातमी ! धावत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, हेल्पलाइनवरून परत मिळवा; साखळी खेचल्यास हाेणार दंड; मदतासाठी काय करावा लागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

SCROLL FOR NEXT