lithium reserves in jammu and kashmir affect indias ev sector electric vehicle prices  
विज्ञान-तंत्र

Lithium Reserves in Kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये सापडलेल्या लिथियममुळे EV सेक्टरला उभारी? वाचा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

जगभरात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर खूप झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान भारतात जम्मू-काश्मीरमधील सियारीमध्ये सापडलेल्या लिथियमच्या साठ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. . देशात प्रथमच लिथियमचा साठा सापडला आहे.हे भारतातील EV (इलेक्ट्रिक वाहन) क्षेत्रासाठी गेम चेंजर मानले जात आहे.

भारतात 5.9 दशलक्ष टन लिथियमचे साठे सापडले आहेत, जे आतापर्यंत जगातील तिसरे सर्वात मोठे साठे आहेत. हे साठे केवळ भारताच्या गरजा भागवणार नाहीत तर अनेक देशांमध्ये निर्यातही होऊ शकते.

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) ने नुकतेच रियासी जिल्ह्यात एक सर्वेक्षण केले होते, ज्यामध्ये लिथियमच्या साठ्याची माहिती समोर आली आहे. पूर्वी भारत परदेशातून लिथीयम आयात करत असे. रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा सर्वाधिक वापर केला जातो.

अशा परिस्थितीत भारताच्या ईव्ही क्षेत्राला या साठ्यांमुळे नव संजीवणी मिळू शकते. एवढेच नाही तर मोबाईलच्या बॅटरीपासून ते इन्व्हर्टर आणि सोलर पॅनलपर्यंत सर्व काही लिथीयमपासून बनवले जाते. याशिवाय, लिथियमचा वापर विमानापासून ते हाय-स्पीड ट्रेन, थर्मोन्यूक्लियर रिअॅक्शन, मूड स्विंग आणि बायपोलर डिसऑर्डरपर्यंतच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

लिथियम कोणत्या देशातून आयात होतं?

भारत अजूनही परदेशातून लिथियम आयात करतो. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली आणि चीन यांचा समावेश आहे. चिलीमध्ये सध्या जगातील सर्वात जास्त लिथियमचा साठा आहे. सुमारे 93 लाख टन लिथियम येथे आहे. यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये 6.3 दशलक्ष टन, अर्जेंटिनामध्ये 2.7 दशलक्ष टन आणि चीनमध्ये 2 दशलक्ष टन लिथियमचे उत्पादन होते.

भारतात सापडलेल्या लिथियम किंमत किती आहे?

भारतातील लिथियम साठ्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर सध्या 1 टन लिथियमची किंमत सुमारे 57.36 लाख रुपये आहे. यामुळे भारतात सापडलेल्या लिथियमचे एकूण मूल्य सुमारे 3,384 अब्ज रुपये असेल. मात्र, लिथियमपासून रिचार्जेबल बॅटरी बनवणे सोपे नाही. अनेक देशांकडे या बॅटरी बनवण्याचे तंत्रज्ञानही नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT