Mahindra Treo esakal
विज्ञान-तंत्र

प्रतिक्षा संपली! पहिली इलेक्ट्रिक रिक्षा Mahindra Treo करा खरेदी

भारताची पहिली इलेक्ट्रिक रिक्षा 'महिंद्रा ट्रेयो' करा खरेदी अन् करा मोठी बचत

गणेश पिटेकर

औरंगाबाद : भारताची पहिली इलेक्ट्रिक रिक्षा महिंद्रा ट्रेयो गेल्या महिन्यात लाँच करण्यात आली आहे. ही महिंद्रा ट्रेयो (Mahindra Treo)आता महाराष्ट्रातही (Maharashtra) खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे. याबाबत महिंद्रा इलेक्ट्रिकने (Mahindra Electric) ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, की महिंद्रा ट्रेयो आता महाराष्ट्रात. एक्स शोरुममधील तिची किंमत आहे २.९ लाख. यावर फेम आणि राज्याकडून अनुदानही मिळेल असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. महिंद्रा ट्रेयोची संकल्पना प्रथम ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर करण्यात आली. या रिक्षाच्या माध्यमातून बचतही करता येईल असा दावा करण्यात आला आहे. ट्रेयो ही माॅड्यूलर प्लॅटफाॅर्मवर आधारित आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश बाबू म्हणतात, खरेदी करणाऱ्या मालकाची यातून २० टक्क्यांपेक्षा अधिक बचत होईल. हा भारतातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही २०१० पासूनच इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासाला आणि गुंतवणुकीला प्रारंभ केला होता, असे महिंद्रा अँड महिंद्रा आणि महिंद्र इलेक्ट्रिकचे अध्यक्ष डाॅ. पवन गोएंका म्हणाले. महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेयोची जोरदार मार्केटिंग सुरु केली आहे. कंपनीने ट्विटवर काही महिंद्रा ट्रेयो विकत घेतलेल्या चालकांचे अनुभव शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन; ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल अन्... 'अशी' होती कारकिर्द

Bharat Taxi : झिरो कमिशनसोबत ‘भारत टॅक्सी’ सेवा लॉन्च; मिळणार अल्प दरात राइड्स, जाणून घ्या दर आणि बुकिंग प्रक्रिया

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

Latest Marathi News Live Update : कृषी उत्पन्न बाजारपेठ उद्या एक दिवसासाठी बंद!

Video: क्रूरतेचं टोक! कृत्रिम पाय उचलून फेकला, अपंगाला अमानूष मारहाण; जीआरपी कॉन्स्टेबलने सगळ्या मर्यादा ओलांडल्या

SCROLL FOR NEXT