Bolero Neo  google
विज्ञान-तंत्र

महिंद्रा बोलेरो निओच्या किंमतीत वाढ, काय असेल नवीन किंमत?

सकाळ डिजिटल टीम

एसयूव्ही गाड्या बनवणारी भारतीय कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra) आपल्या अनेक कारच्या किमतीमध्ये 12 ते 30 हजारांची वाढ केली आहे. कंपनीने नुकत्याच लॉन्च झालेल्या Bolero Neo SUV च्या किमतीत सर्वात जास्त वाढ केली आहे. महिंद्राने बोलेरो निओ एसयूव्ही खरेदीसाठी आता ग्राहकांना 30,000 रुपये जास्त द्यावे ळागणार आहेत. यापुर्वी ही एसयूव्ही 8.48 लाख रुपये (एक्स-शोरूम, पॅन इंडिया) सुरुवातीच्या किमतीला लॉंच करण्यात आली होती त्यासोबतच मल्टी टेरिन फीचरसह टॉप-स्पेक ट्रिम बोलेरो निओ एन 10 (O) साठी 10.69 लाख रुपये मोजावे लागत.

नव्या वाढलेल्या किंमतीनुसार महिंद्रा बोलेरो निओ एन 10 (ओ) ची किंमत आता 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे, तर N4 व्हेरियंटची किंमत आता 7 8.77 लाख रुपये करण्यात आली आहे. बोलेरो नियो एसयूव्ही सोबतच महिंद्राने स्कॉर्पियो एसयूव्हीच्या किंमती देखील वाढवल्या आहेत. MPV ची किंमत 12,000 ते 14,000 दरम्यान वाढवण्यात आली आहे, तर Scorpio S11 व्हेरियंटची किंमत ही 22,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे.

महिंद्रा बोलेरो निओ सध्या भारतात चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ते म्हणजे N4, N8, N10, आणि N10 (O). SUV च्या या सर्व व्हेरियंटच्या किंमतीत जवळपास 30,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन महिंद्रा बोलेरो निओची किंमत आता बेस एन 4 व्हेरिएंटसाठी 8.77 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक N10 (O) व्हेरिएंटसाठी 10.99 लाख रुपयांपर्यंत जाते.

नवीन महिंद्रा बोलेरो निओ मध्ये BS6 कंप्लायंट 1.5-लीटर mHawk डिझेल इंजिन दिले आहे आहे. हे 3750 आरपीएमवर 100 एचपी पॉवर आणि 1750-2250 आरपीएम वर 260 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये येते आणि त्यात इको मोड देखील आहे. महिंद्रा बोलेरो नियो ही भारतातील एकमेव सब -4-मीटर एसयूव्ही आहे जी बॉडी-ऑन-फ्रेम चेसिस आणि रियर-व्हील ड्राइव्हवर आधारित आहे. त्याच्या टॉप-स्पेक N10 (O) व्हेरिएंटला मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी देखील मिळते.

बोलेरो निओच्या इंटीरियर मध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्रूज कंट्रोल, रियर पार्किंग असिस्ट सारखी बेसिक फीचर्स मिळतात. सुरक्षा फीचर्समध्ये ड्युअल एअरबॅग, एबीएस आणि कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल (सीबीसी) आणि बरेच फीचर्स दिले आहेत. यात कॉइल स्प्रिंग्स आणि स्टॅबिलायझर बारसह स्वतंत्र फ्रंट आणि मल्टी-लिंक रियर सस्पेंशन देखील मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

Pune Municipal Elections : पुण्यात महापालिका निवडणुकीपूर्वी धक्कादायक वळण! भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका

Mumbai Municipal Corporation Election : मोट बांधण्याची मविआची हालचाल; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी प्रयत्न

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

SCROLL FOR NEXT