महिंद्रा थार एसयूव्ही जीप Mahindra Thar SUV Jeep
विज्ञान-तंत्र

Mahindra Thar SUV युवा वर्गात लोकप्रिय, वर्षभरात ७५ हजार बुकिंग

सकाळ डिजिटल टीम

महिंद्रा अँड महिंद्राची थार जीपची वर्षभरात ७५ हजार बुकिंग झाल्या आहेत. तरुणांमध्ये कंपनीच्या या एसयूव्हीला जास्त पसंती मिळत आहे. त्यामुळे सर्वाधिक बुकिंग तरुणाईने केले आहे. महिंद्रा थार एसयूव्हीला (Mahindra And Mahindra) अद्ययावत करुन गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने त्याची ७५ हजार बुकिंग पूर्ण केले आहेत. यातून महिंद्रा थारची (Mahindra Thar SUV) लोकप्रियता तरुणाईत दिसत आहे. तिची क्रेझ निर्माण झाली आहे.

तरुण मंडळींनी केले सर्वाधिक बुकिंग

कंपनीनुसार महिंद्रा थार एसयुव्हीची एकूण बुकिंगमध्ये ४० टक्के तरुण मंडळींनी केली आहे. एकूण बुकिंगपैकी २५ टक्के वाहने पेट्रोल व्हर्जनची बुक करण्यात आली आहे. यातून दिसते की इंधन दरवाढीचा लोकांचे वाहन खरेदी परिणाम जास्त परिणाम झालेला नसल्याचे दिसते.

या व्हेरियंटची क्रेझ

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या एकूण बुकिंगपैकी ५० टक्के बुकिंग्स महिंद्रा थार एसयूव्हीच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंटची झाली आहे. याचा अर्थ असा की लोक आता वाहनांचे हायएण्ड व्हेरियंट आणि नवीन टेक्नोलाॅजीच्या वापराकडे जास्त वळले आहेत.

महिंद्रा थार एसयूव्हीची कामगिरी

महिंद्रा थार एसयूव्हीमध्ये २.० लिटरचे एमस्टॅललाईन पेट्रोल इंजिन आणि २.२ लिटरचे एमहाॅक डिझेल इंजिन पर्याय आहे. यात पेट्रोल इंजिन १५० बीएचपीची मॅक्झिमम पाॅवर आणि ३२० एनएमचे पिक टाॅर्क जेनरेट करते. दुसरीकडे डिझेल इंजिन १३० बीएचपीचे पाॅवर आणि ३२० एनएमचे टाॅर्क जेनरेट करते. ग्राहक ७ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमधून एकाची निवड करु शकता. तिची दिल्ली एक्स-शोरुमची किंमत १२.७८ लाख रुपयांपासून सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT