महिंद्राची XUV 3XO RevX ही किफायतशीर किंमतीत आधुनिक SUV आहे.
तीन ट्रिम्समध्ये सादर, सर्व व्हेरिएंट फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध.
RevX A मध्ये प्रीमियम फिचर्ससह टॉप-एंड टेक्नॉलॉजीचा समावेश.
महिंद्राने आपली सर्वात स्वस्त SUV ‘XUV 3XO’ आता आणखी स्टायलिश आणि स्पोर्टी रूपात सादर केली आहे. 'RevX' नावाच्या या नव्या व्हेरिएंटमध्ये आकर्षक डिझाइन, प्रीमियम फीचर्स आणि दमदार इंजिनचे कॉम्बिनेशन आहे. किंमतही आपल्या बजेटमध्ये आहे फक्त 8.94 लाखांपासून सुरुवात! ही नवीन सीरिज लॉंच करत ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम अनुभव उपलब्ध करून दिला आहे. या नव्या ट्रिम्समध्ये RevX M, RevX M(O) आणि RevX A हे तीन पर्याय असून सर्व पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहेत.
1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 200Nm टॉर्क
बॉडी-कलर ग्रिल, एलईडी डीआरएल, ड्युअल टोन रूफ
6 एअरबॅग्स, 4 डिस्क ब्रेक्स, ESC सह 35 सुरक्षा फीचर्स
RevX M समान इंजिन आणि फीचर्स
सिंगल पॅन सनरूफ
1.2 लिटर TGDi प्रगत पेट्रोल इंजिन, 230Nm टॉर्क
मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय
पॅनोरॅमिक सनरूफ, लेदरेट सीट्स, ड्युअल HD डिस्प्ले, अलेक्सा सपोर्ट
RevX व्हेरिएंटमध्ये स्पोर्टी डिझाइन, स्पेशल बॅजिंग आणि R16 अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. आंतरंगात स्मार्ट फीचर्स, वायरलेस कनेक्टिव्हिटी, ऑटो डिमिंग मिरर आणि ड्युअल टोन इंटीरियरने SUVचा अनुभव अधिक आधुनिक बनवला आहे.
महिंद्राची ही नवी SUV शहरी आणि ग्रामीण ग्राहकांसाठी सारखीच उपयुक्त ठरणार आहे. दमदार इंजिन, प्रगत सेफ्टी फीचर्स आणि अत्याधुनिक इन्फोटेनमेंटसह RevX ही भारतात SUV खरेदीसाठी सर्वोत्तम निवड ठरू शकते.
महिंद्राची XUV 3XO RevX किती किमतीपासून सुरू होते?
– ही SUV 8.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
RevX व्हेरिएंटमध्ये डिझेल इंजिनचा पर्याय आहे का?
– नाही, हे सर्व व्हेरिएंट फक्त पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध आहेत.
RevX A प्रकारात कोणती खास वैशिष्ट्ये आहेत?
– पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल HD स्क्रीन, अलेक्सा कनेक्टिव्हिटी आणि लेदरेट सीट्स.
RevX M(O) मध्ये M पेक्षा काय वेगळं आहे?
– RevX M(O) मध्ये सनरूफसारखी अतिरिक्त प्रीमियम फीचर देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.