विज्ञान-तंत्र

महिंद्राने पुन्हा परत मागवल्या XUV700 अन् Thar, जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

महिंद्रा XUV700 आणि थार दोन्ही वाहनांच्या टर्बोचार्जरमध्ये समस्या आल्यानंतर या दोन्ही गाड्या कंपनीकडून परत मागवल्या जात आहेत. दरम्यान महिंद्राची XUV700 परत मागवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या गाड्या रिकॉल केल्यामुळे ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

महिंद्राचा XUV700 पेट्रोल व्हेरियंट त्याच्या GVV व्हेंट पाईप आणि टी-ब्लॉक कनेक्टर इंस्टॉलेशनच्या चाचणीसाठी परत मागवण्यात आली आहे. लाइफस्टाइल ऑफ-रोडर थार बद्दल बोलयचे झाल्यास, डिझेल व्हेरिएंटमध्ये XUV700 प्रमाणेच टर्बो अ‍ॅक्ट्युएटर समस्या असल्याचे बोलले जात आहे.

कंपनी डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही व्हेरिएंटवर टायमिंग बेल्ट आणि ऑटो-टेंशनर बदलत आहे. कंपनीने या रिकॉलमध्ये सर्व XUV700s आणि थारचा समावेश केलेला नाही. या रिकॉलमध्ये किती वाहने परत मागवण्यात आली हेही अद्याप कळू शकलेले नाही. तथापि, ग्राहक 'सर्व्हिस-अॅक्शन' सेक्शनमध्ये हे तपासू शकतात. महिंद्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचे वाहन रिकॉल केलेल्या वाहनांमध्ये आहे की नाही ते पाहू शकता.

महिंद्राने अलीकडेच XUV700 आणि थारच्या किमतीही वाढवल्या आहेत. XUV700 आता 37000 रुपयांनी आणि थार 28000 रुपयांनी महागली आहे.या दोन्ही SUV मध्ये 2.2L टर्बो-डिझेल इंजिन आणि 2.0L टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT