Make artistic use of the YouTube channel; Simple tips
Make artistic use of the YouTube channel; Simple tips e sakal
विज्ञान-तंत्र

युट्यूब चॅनेलचा करा कलात्मक वापर; सोप्या टिप्स

केतन पळसकर

स्वतःमधील कौशल्य जगासमोर मांडण्यासाठी पण यूट्यूब एक उत्तम व्यासपीठ आहे. अनेक चॅनेल्स सध्या यूट्यूबवर खूप प्रसिद्ध आहेत. ही प्रसिद्धी आणि पैसे पाहून आपणही एखादे यूट्यूब चॅनेल सुरू करावे असे बऱ्याच जणांना वाटते. मात्र, अनेक शंका या उद्याच्या कलावंतांपुढे येतात.

व्हिडीओ करताना महत्त्वाचे-

यूट्यूब चॅनेलवर तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचे कोणतेही व्हिडीओ अपलोड करू शकता. तुम्ही जर दीर्घकाळाचा विचार करत असाल तर, अशा विषयांवर व्हिडीओ अपलोड करा जे तुमचं पॅशन अर्थात सर्वस्व, आवड आहे. कुकिंग, कॉमेडी, टेक्नोलॉजी, टुरिझम अशा विविध प्रकारच्या व्हिडीओची सरमिसळ करू नका.

असे केल्यास तुमच्या चॅनेलची एक स्वतंत्र ओळख निर्माण होणार नाही. तुमच्या चॅनेलची ओळख ही त्यावरील व्हिडीओच्या प्रकारामुळे होते. त्यामुळे एकाच प्रकारचे व्हिडीओ अपलोड करा. (Make artistic use of the YouTube channel; Simple tips)

अपलोड करण्याचे मार्ग-

थेट आपल्या संगणकामधून, वेबकॅमवरून थेट व्हिडिओ रेकॉर्ड करून, एखादा स्लाइड शो, लाइव्ह हँगआउट (व्हिडीओ कॉलिंग) करून, एखादा व्हिडीओ एडिटरमधून एडिट करून अपलोड करू शकता.

व्हिडिओ रेकॉर्ड कसं करू?

व्हिडीओ अपलोड करताना सुरुवातीला या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. तुम्ही जर कॅमेरा, दिसणे या गोष्टींचा जास्त विचार केला तर तुम्ही तुमच्या पहिल्याच व्हिडीओत खूप वेळ वाया घालवाल. त्यामुळे सुरुवातीला जास्त काळजी न करता व्हिडीओ अपलोड करा. तुम्ही १०-१२ व्हिडीओ अपलोड कराल, तसतशी तुम्हाला प्रतिक्रिया आणि वेळ मिळत जाईल. त्यातून तुम्ही सुधारणा करीत जाल आणि मग पुढे इतर गोष्टींची काळजी घ्यायला सुरुवात करा.

असे हाताळा चॅनल-

तुमच्या व्हिडीओमधील विषय हे लोकांना खरे वाटले पाहिजे. त्यांना ते आयुष्याशी साधर्म्य साधणारे वाटले पाहिजे. त्यांना खऱ्या आयुष्यातील प्रसंगांशी त्या विषयाचा संबंध जोडता आला पाहिजे. एखाद-दुसरा व्हि​डीओ अपलोड केला आणि नंतर वर्ष, सहा महिन्यांनी एक व्हि​डीओ अपलोड केला, असं अजिबात करू नका. व्हि​डीओ अपलोड करण्यात सातत्य राखा. दर आठवड्यात किती व्हि​डीओ अपलोड करायचे हे आधीच ठरवा आणि त्याचं पालन करा. तुमच्या व्हिडीओमधून प्रेक्षकांशी संवाद साधा. तुमचा टार्गेट प्रेक्षक कोणता हे आधी ठरवा. त्यानुसार व्हिडीओमधील कंटेंट तयार करा. तुमचे विचार स्पष्टपणे आणि नीट-नेटके मांडा.

असे मिळवा व्ह्युज-

जेव्हा तुमचे व्हिडीओ प्रसिद्ध होतात म्हणजेच जेव्हा तुमच्या व्हिडीओचे हिट्स वाढतात, तेव्हा यूट्यूब तुम्हाला काही रक्कम देते. या सोबत, हिट्स अथवा व्ह्यूची ठरविक संख्या पार झाल्यावर तुम्हाला जाहिरातीसुद्धा मिळतात. या जाहिराती तुम्हाला काही ठराविक रक्कम देतात. तुमचं चॅनेल सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी यूट्यूबसुद्धा तुमची मदत करते. व्हिडीओला मिळणाऱ्या प्रतिक्रियांना उत्तरे द्या. तुमचे चॅनेल कुकिंग, टेक्नोलॉजी, अभ्यास आदी विषयांवर असेल तर तुम्ही लाइव्ह प्रश्नोत्तरांचा ताससुद्धा घेऊ शकता. यासाठी तुम्ही हँग आउटची मदत घेऊ शकता. आपल्या व्हिडीओमधून इतरांना प्रोत्साहन द्या.

ही काळजी घ्याच-

अनेकदा यूट्यूबवरील इतर व्हिडीओ पाहून प्रभावित होतो. ते पाहून बऱ्याचदा असंही वाटत की आपणही अशाच प्रकारचे व्हिडीओ अपलोड करावे. पण उगीच कोणाची नक्कल करू नका. तुम्हाला जे मनातून उस्फूर्तपणे सुचते त्यावर व्हिडीओ बनवा. यूट्यूबवर जर कोणी व्यक्ती दुसऱ्याचे व्हिडीओ अपलोड करत असेल तर त्या व्हिडीओचा मूळ मालक त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. अशी तक्रार आल्यास यूट्यूबकडून तो व्हिडीओ काढण्यास सांगितलं जाते. व्हिडीओवर देखरेख करणारी यूट्यूबची स्वतःची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. या यंत्रणेमार्फत यूट्यूब आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाकतं. या शिवाय सामान्य यूजरसुद्धा यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना त्या खाली असलेल्या ऑप्शन्समधून तक्रार दाखल करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT