Robot Killed Man eSakal
विज्ञान-तंत्र

Robot Killed Man : रोबोटने घेतला माणसाचा जीव; दक्षिण कोरियातील धक्कादायक घटना! काय आहे प्रकरण?

South Korea Robot : हा रोबोट एका व्हेजिटेबल फॅक्टरीमध्ये काम करत होता.

Sudesh

Robot Killed Man in South Korea : आजकाल प्रत्येक क्षेत्रात एआय आणि रोबोटचं वर्चस्व दिसून येत आहे. चुका या माणसाकडूनच होतात, मशीनकडून नाही; असं आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलं असेल. मात्र, हे खरं आहे का? दक्षिण कोरियामध्ये एका रोबोटने चक्क माणसाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रोबोटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा रोबोट एका व्हेजिटेबल फॅक्टरीमध्ये काम करत होता. मिरच्यांचे बॉक्स एका कन्व्हेयर बेल्टवर ठेऊन पुढे पाठवणे हे त्याचं काम होतं. यावेळी रोबोटिक्स कंपनीतील एक कर्मचारी रोबोटचे सेन्सर तपासण्यासाठी तिथे आला.

अशी झाली दुर्घटना

यावेळी रोबोटने त्या व्यक्तीलाही मिरचीचा बॉक्स समजलं, आणि त्याला पकडून उचललं. इतर मिरचीच्या बॉक्सप्रमाणेच या व्यक्तीलाही रोबोटने कन्व्हेयर बेल्टवर ढकलून दिलं. यामुळे या व्यक्तीच्या चेहऱ्याला आणि छातीला मार बसला. यातच त्याचा मृत्यू झाला. (Tech News)

या रोबोटच्या सेन्सरमध्ये काही त्रुटी झाल्यामुळे त्याला मिरचीचा बॉक्स आणि माणूस यातील फरक समजला नाही. दक्षिण कोरियामध्ये या वर्षातील झालेली ही दुसरी अशी घटना आहे, ज्यामध्ये मशीनच्या चुकीमुळे मानवाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मशीनवर आपण किती अवलंबून रहायचं याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT