Maruti Suzuki Baleno Booking News Updates esakal
विज्ञान-तंत्र

नवीन Maruti Balenoची बुकिंग सुरु, लाँच कधी होणार जाणून घ्या

आता तुमची प्रतिक्षा संपणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कार बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) लोकप्रिय माॅडल बलॅनोच्या नवीन आणि फेसलिफ्ट व्हर्जनचे लोक खूप दिवसांपासून प्रतिक्षा पाहत आहेत. मात्र समोर आलेल्या वृत्तानुसार आता तुमची प्रतिक्षा संपणार आहे. नव्या माहितीनुसार कंपनी या महिन्यात Baleno Facelift ला लाँच करेल आणि त्यासाठी नोंदणी लवकरच सुरु होणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी १० फेब्रुवारीला मारुती सुझुकी फेसलिफ्ट ही कार लाँच करु शकते. ही लोकप्रिय कार पसंत करणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करु इच्छित असाल तर एक फेब्रुवारीपासून तिची बुकिंग सुरु झाली आहे.(Maruti Suzuki Baleno Facelift Booking Starts From 1st February)

नवीन माॅडलमध्ये हे असेल खास

नवीन माॅडलबाबत लीक झालेल्या माहितीनुसार Maruti Baleno 2022 मध्ये नवीन आणि रुंद ग्रिलसह सर्वोत्तम हेडलॅम्प पाहायला मिळाले. याबरोबरच नवी मारुती सुझुकी बलॅनोत एचयूडी, ईएसपी, ६ एअरबॅग आणि वायरलेस चार्जिंग सुविधासारखे प्रीमियम फिचर्स असण्याची शक्यता आहे. मारुतीच्या सर्वाधिक विकणाऱ्या कारमध्ये (Maruti's Best Selling Cars) एक बलॅनोच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये फ्रंट बंपर, एलईडी सिग्नेचरसह नवीन स्प्लिट टेललाईट्स, ड्युअल टोन अलाॅय व्हिल्ज आणि सर्वोत्तम बंपरही असेल. (Maruti Suzuki Baleno Booking News Updates)

हे फिचर्सही असतील

जर या कारच्या इतर फिचर्सबाबत बोलाल तर यात टोयोटाच्या मदतीने विकसित एक फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम, एक हेड अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग सुविधा, क्रूझ कंट्रोल, पुश-बटन, इंजिन स्टार्ट आणि स्टाॅप, नवीन एअर कंडिशनिंग वेंट्स आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT