Maruti Suzuki Dzire S-CNG with 31.12 Km/Kg Mileage Launched check Price rak94
Maruti Suzuki Dzire S-CNG with 31.12 Km/Kg Mileage Launched check Price rak94 
विज्ञान-तंत्र

Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

रोहित कणसे

सुझुकी इंडियाने S-CNG तंत्रज्ञानासह Dzire ही कार लाँच केली आहे. Dzire CNG मध्ये K-सिरीज ड्युएलजेट, ड्युअल-VVT 1.2-लिटर इंजिन देण्यात आले आहे. जे CNG मोडमध्ये 76hp पावर , तर सामान्य पेट्रोल मोडमध्ये 89hp पावर देते. तसेच टॉर्कचे आकडे देखील यामध्ये वेगवेगळे असून ही कार CNG मोडमध्ये 98.5Nm तर पेट्रोल मोडमध्ये 113Nm इतका टॉर्क जनरेट करते. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास Desire S-CNG ही कार सीएनजी मोडमध्ये 31.12 चे जबरदस्त मायलेज देईल.

किंमत किती आहे?

या कारची किंमत (INR) VXI साठी 8,14,000 रुपये आणि ZXI साठी 8,82,000 रुपये इतकी आहे. तुम्ही सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून देखील मारुती सुझुकी डिझायर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला पेट्रोल व्हेरिएंटसाठी 14,100 रुपये आणि सीएनजी व्हेरिएंटसाठी 16,999 रुपये मोजावे लागतील.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटींग आणि सेल्स) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, जग ग्रीन फ्युचरकडे वाटचाल करत आहे. मारुती सुझुकीने ग्रीन व्हेकल्सच्या वाढत्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. S-CNG सारख्या ट्रांसफोर्मेटिक तंत्रज्ञानामुळे ग्राहक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी S-CNG वाहने खरेदी करत आहेत.

श्रीवास्तव म्हणाले की, आज आमच्याकडे 9 S-CNG वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. एस-सीएनजी वाहनांच्या चांगल्या मायलेजमुळे त्यांची मागणी वाढली आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांत आमच्या S-CNG विक्रीत 19 टक्क्यांची CAGR वाढ पाहिली आहे. ग्राहक तांत्रिकदृष्ट्या प्रगत, पर्यावरणपूरक, फॅक्टरी-फिट आणि सुरक्षित मारुती सुझुकी एस-सीएनजी वाहने अधिकाधिक स्वीकारत आहेत, याची साक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT