maruti suzuki recalls more than 9000 units of wagon r celerio ignis  
विज्ञान-तंत्र

Maruti Suzuki च्या 'या' 9925 गाड्यांमध्ये बिघाड; कंपनीने परत मागवली वाहने

सकाळ डिजिटल टीम

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने शनिवारी जाहीर केले की त्यांनी वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निसच्या 9,925 युनिट्स परत मागवल्या आहेत.3 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 दरम्यान तयार करण्यात आलेल्या अशा कार कंपनीने परत मागवल्या आहेत.

याच्या कारणाबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, या गाड्यांच्या मागील ब्रेक असेंबली पिनमध्ये दोष आढळून आला आहे. मारुती सुझुकीने सांगितले की, ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून वाहन परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारचे सदोष भाग मोफत बदलले जातील असेही कंपनीने म्हटले आहे.

मारुती सुझुकी काय म्हणाली?

मारुती सुझुकीने आपल्या बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की आम्हाला शंका आहे की मागील ब्रेक असेंबली पिन (पार्ट) मध्ये दोष आहे, ज्यामुळे प्रवास करताना खूप आवाज येतो. या खराबीमुळे दीर्घ कालावधीत ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने सदोष भागांच्या चाचणीसाठी वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

रिप्लेसमेंटची व्यवस्थाही केली जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मारुती सुझुकी ज्यांच्या कारमध्ये बिघाड स्वतः आपल्या ग्राहकांशी संपर्क साधणार आहे. मारुती सुझुकीने शुक्रवारी सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीसाठी स्टॅंडअलोन नेट प्रॉफिट जाहीर केला, जे दर्शविते की कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा चार पटीने वाढून 2,062 कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल जवळपास 46 टक्क्यांनी वाढून 29,931 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर या तिमाहीत एकूण विक्रीचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढून 517,395 युनिट्सवर पोहोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tehsildar Attack : नागपुरात तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं अन्... "कायदा आता माफियांच्या दादागिरीने चालतोय का?" वडेट्टीवारांचा सवाल

Bank Closed: सलग 4 दिवस बँका बंद राहणार? SBI बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला देशव्यापी संप!

Alandi Palakhi: आळंदी देवस्थान आक्रमक भूमिकेत; पुणे मुक्कामाबाबत अंतिम निर्णय १३ मे नंतर, प्रशासन-देवस्थान समन्वयानंतर वेळापत्रक जाहीर होणार!

Bhopal Child Abuse Case : संतापजनक ! ७५ वर्षीय वकिलाकडून ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, घरात खेळायला आली अन्...

Latest Marathi News Live Update : बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार; पंतप्रधान मोदीही उपस्थित

SCROLL FOR NEXT