Youtube Sakal
विज्ञान-तंत्र

लाखोंचं कर्ज आई अंथरूणात; यूट्यूबच्या मदतीने 'अर्जुन'नं फेडलं ४० लाखांचं कर्ज

व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube हे एक अतिशय लोकप्रिय व्यासपीठ आहे.

सकाळ डिजिटल टीम

Men Clear Lone With Help Of You tube : व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube हे एक अतिशय लोकप्रिय व्यासपीठ आहे. यावर व्हिडिओ बनवूनही लाखोंची कमाईदेखील करता येते. अशीच कमाई करून एका व्यक्तीने त्याच्या डोक्यावर असलेलं ४० लाखांचं कर्ज फेडलं आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

एका व्यक्तीने यूट्यूब व्हिडिओंमधून एवढी कमाई केली की, त्याने त्याच्यावर असलेले ४० लाख रुपयांचे कर्जही फेडले. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अर्जुन योगन असे या व्यक्तीचे नाव आहे.

अर्जुन सांगतो की, आई आजारी असल्याने वडील नोकरी करू शकत नव्हते. या सर्व प्रकरणात डोक्यावर ४० लाखांचे कर्ज झाले. हे फेडण्यासाठी सुरूवातीला काहीकाळ काम केले. पण ही रक्कम कर्ज फेडू शकेल एवढी नव्हती. तो सांगतो की, मला अॅनिमेशनची आवड होती. ही आवड जपण्यासाठी मी व्हिडिओ बनवत असे.

कालांतराने मी बनवलेले व्हिडिओ यूजर्सच्या पसंतीस पडू लागले. त्याला लाखो व्ह्यूज, लाईक्स आणि शेअर्स मिळू लागले. व्हिडिओजला वाढत्या प्रतिसादामुळे यूट्यूबकडून पैसे मिळण्यास सुरूवात झाली. काही दिवसांनी ही कमाई इतकी वाढली की, याच्या माध्यमातून मी झालेल्या सर्व कर्जाची रक्कम फेडू शकलो. आता अर्जुन लंडनमधील पेंटहाऊसमध्ये राहतो आणि बीएमडब्ल्यू कार चालवतो.

यूट्यूबवरून कशी करता येते लाखोंची कमाई?

अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, यूट्यूब व्हिडीओमधून पैसे कसे कमावले जातात. तर सर्वात पहिले यासाठी यूट्यूबवर विशिष्ट श्रेणीतील व्हिडिओ बनवून ते नियमितपणे पोस्ट करावे लागतात. तुमचे चॅनल जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे लागते. तसेच याच्या माध्यामातून कमाईसाठी काही आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतात.

तुम्ही YouTube जाहिरातींद्वारे चांगली कमाई करू शकता. कमाईचा एक मोठा भाग तुमच्याकडे फक्त YouTube जाहिरातींद्वारे येईल. व्हिडिओच्या मध्यभागी दिसणार्‍या जाहिरातीतून निर्माता आणि कंपनी कमाई करतात. आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि त्यानंतर तुमच्या बँके खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होईल.

यूट्यूब शॉर्ट्स

सध्या यूट्यूबवर व्हिडिओंसह यूट्यूब शॉर्ट्सचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. यावर्षी कंपनीने यासाठी अनेक बोनस कार्यक्रमही जाहीर केले आहेत. दिली जाणारी ही बोनस रक्कम कंटेंट आणि व्ह्यूजनुसार दिले जाणार आहे. तुमचा कंटेंट आणि व्ह्यूज चांगले असतील तर तुम्ही याच्या माध्यमातून 10 हजार डॉलर्सपर्यंतची रक्कम कमावू शकता.

याशिवाय YouTube Premium सबस्क्रिप्शन आणि चॅनल मेंबरशिपद्वारेही कमाई करता येते. YouTube Premium सबस्क्रिप्शनमधील बहुतांश महसूल त्यांच्या गुंतवणूकदरांना जातो. सबस्क्रिप्शनद्वारे, निर्माते मासिक पेमेंटच्या आधारावर एक्सक्लूसिव कंटेट ऑफर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT