जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया (Social Media) म्हणून ओळख असलेल्या फेसबुकच्या (Facebook) कर्मचाऱ्यांना लवकरच नवी ओळख मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी उदयास आलेल्या मेटा कंपनीच्या ब्रीद वाक्यात देखील बदल करण्यात आला आहे. कंपनीच्या या बदलांबाबत फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गने फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. (Meta Employee Now Called As Metamates)
मार्कने (Mark Zuckerberg) केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्याने म्हंटलंय की, ज्या प्रकारे गुगल (Google) त्यांच्या कर्मचाऱ्यांना गुगलर्स म्हणून संबोधते, मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टीज म्हणून संबोधते त्याच प्रमाणे यापुढे मेटाच्या कर्मचाऱ्यांना ‘मेटामेट्स’ या नावाने संबोधले जाणार आहे. नव्याने करण्यात आलेले बदल येणाऱ्या काही दिवसातच लागू केले जातील, असे देखील मार्कने त्याच्या पोस्मटध्ये म्हटले आहे.
मेटाच्या ब्रीदवाक्यातही बदल
कर्मचाऱ्यांना संबोधण्यात येणाऱ्या नावाच्या बदलासोबतच मार्कने मेटा कंपनीच्या ब्रीदवाक्यात देखील बदल केला आहे. त्यानुसार ‘मेटा, मेटामेट्स अँड मी’ असे नवे ब्रीदवाक्याची घोषणा देखील मार्कने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.