Meta deleted Facebook Accounts Brazil India esakal
विज्ञान-तंत्र

Facebook Accounts Delete : फेसबुकने भारतीयांना दिला दणका! डिलीट केले तब्बल 23 हजार अकाउंट्स, नेमकं कारण काय?

Meta deleted Facebook Accounts Brazil India : मेटाने भारत आणि ब्राझीलमधील गुंतवणूक फसवणुकीसंदर्भात फेसबुकवरील २३,००० पेक्षा जास्त बनावट अकाउंट्स हटवले आहेत.

Saisimran Ghashi

Meta deleted Facebook Accounts : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सचे मालक असलेल्या मेटा कंपनीने एक मोठी कारवाई करत तब्बल २३,००० बनावट फेसबुक पेजेस आणि अकाउंट्स हटवले आहेत. ही कारवाई मार्च २०२५ मध्ये करण्यात आली असून भारत आणि ब्राझीलमधील वापरकर्त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळ्यांवर हा मोठा घाव मानला जात आहे.

या बनावट अकाउंट्समधून विविध 'इन्व्हेस्टमेंट स्कीम्स' आणि जुगाराचे अ‍ॅप्स यांची जाहिरात केली जात होती. विशेष म्हणजे, फसवणूक करणाऱ्यांनी लोकप्रिय क्रिकेटपटू, वैयक्तिक आर्थिक सल्लागार (फायनान्स इन्फ्लुएन्सर्स) आणि उद्योजक यांची नक्कल करत जनतेचा विश्वास संपादन केला होता. या हेतूने डीपफेकसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.

सल्ल्याच्या नावाखाली फसवणूक

मेटाच्या माहितीनुसार, हे स्कॅमर्स सोशल मिडियावर लोकांशी संपर्क साधून त्यांना 'गुंतवणुकीचा सल्ला' देण्यासाठी खास मेसेंजिंग अ‍ॅप्सवर घेऊन जात होते. तिथून पुढे लोकांना बनावट वेबसाइट्सवर वळवले जात होते, ज्या वेबसाइट्सवरून त्यांच्या आर्थिक फसवणुकीस सुरुवात केली जात होती.

वापरकर्त्यांसाठी मेटाची जनजागृती

या वाढत्या धोखाधडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मेटाने वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कंपनीने ऑनलाइन गुंतवणूक व पेमेंट फसवणुकीपासून वाचण्यासाठी मार्गदर्शक टिप्स आणि माहितीही उपलब्ध करून दिली आहे.

भारतातील वापरकर्ते प्रमुख लक्ष्य

विशेष बाब म्हणजे, भारत हा फेसबुकचा सर्वात मोठा वापरकर्ता देश आहे. ३७५ दशलक्षहून अधिक फेसबुक युजर्स भारतात आहेत तर इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड आहे. त्यामुळे फसवणुकीचा धोका अधिक गंभीर ठरतो.

झुकरबर्गची चिंता

दरम्यान, मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकच्या सामाजिक प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेल्या अँटीट्रस्ट खटल्यात २०२२ मधील त्यांचे आणि फेसबुक प्रमुख टॉम अ‍ॅलिसन यांच्यातील ईमेल्स समोर आले आहेत, ज्यामध्ये झुकरबर्गनी फेसबुकवरील वापर स्थिर असला तरी त्याचा सांस्कृतिक प्रभाव कमी होत असल्याचे नमूद केले आहे.

इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारखी इतर प्लॅटफॉर्म्स मजबूत असली, तरीही फेसबुकचा प्रभाव कमी होत आहे, ही गोष्ट झुकरबर्ग यांना खटकत असल्याचेही या ईमेल्समधून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT