Meta AI Image Label eSakal
विज्ञान-तंत्र

Meta AI : 'डीपफेक' विरोधात मेटाचं मोठं पाऊल; फेसबुक-इन्स्टावर एआय-जनरेटेड फोटोंवर येणार विशेष लेबल

Meta AI Image Detector : मेटा स्वतःच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूलने तयार केलल्या फोटोंबाबत ही पॉलिसी आधीपासूनच फॉलो करत आहे.

Sudesh

Meta to label AI-Generated Images : सध्या इंटरनेटवर सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे डीपफेक. आतापर्यंत कित्येक सेलिब्रिटींचे आक्षेपार्ह डीपफेक फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. केवळ सेलिब्रिटींनाच नाही, तर सामान्य नागरिकांना देखील या तंत्रज्ञानापासून मोठा धोका आहे. खोट्या फोटोंच्या माध्यमातून कुणाचीही फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे असे फोटो ओळखता येणं गरजेचं झालं आहे.

मेटाने आता या दृष्टीने पावलं उचलली असून, ते आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एआय-जनरेटेड फोटोंना लेबल लावण्याच्या तयारीत आहेत. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा थ्रेड्सवर देखील जर कोणी एआय-जनरेटेड फोटो पोस्ट केला; तर त्यावर 'एआय जनरेटेड' (AI Generated) असं स्पष्टपणे लिहिलेलं दिसेल. यामुळे खरे आणि खोटे फोटो ओळखणं सोपं जाणार आहे. (Meta's Big Step Against 'Deepfake'; Special label coming to AI-generated photos on Facebook-Instagram)

मेटा स्वतःच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूलने तयार केलल्या फोटोंबाबत ही पॉलिसी आधीपासूनच फॉलो करत आहे. 'मेटा एआय' (Meta AI) वापरुन तयार केलेले फोटो जर फेसबुक किंवा इन्स्टावर शेअर केले, तर त्यावर 'इमॅजिन्ड विथ एआय' (Imagined with AI) असं लिहिलेलं दिसून येतं. अर्थात, हे फीचर सध्या इतर एआय टूल्स वापरून तयार केलेल्या फोटोंवर लागू होत नाही.

मेटाचे ग्लोबल अफेअर्स प्रेसिडेंट निक क्लेग म्हणाले, की इतर फोटोंबाबत आम्ही इंडस्ट्री पार्टनर्ससोबत चर्चा करत आहोत. एआय जनरेटेड कंटेंटमध्ये एक समान धागा असावा, ज्यामुळे त्यांना ओळखणं सोपं जाईल. "यासाठी काही कॉमन स्टँडर्ड्स लागू करणं गरजेचं आहे, आणि यासाठी आम्ही इंडस्ट्रीमधील इतर मुख्य कंपन्यांसोबत मिळून काम करत आहोत", असं ते म्हणाले. (Ai tools)

इतर कंपन्यांची साथ महत्त्वाची

मेटाने म्हटलं आहे की हे फीचर सुरू करण्याची सगळ्यात मोठी अडचण इतर कंपन्या आहेत. गुगल, ओपन एआय, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडोब, मिडजर्नी, शटरस्टॉक अशा एआय टूल्स असणाऱ्या कंपन्यांनी आपल्या फोटोंमध्ये मेटाडेटा जोडणं गरजेचं आहे. यानंतरच फेसबुक, इन्स्टा आणि थ्रेड्सवर हे एआय-जनरेटेड फोटो डिटेक्स करणं शक्य होणार आहे. (Support from other companies is important)

ऑडिओ-व्हिडिओचं काय?

मेटाने म्हटलं आहे की इतर अ‍ॅप्स वापरून तयार केलेले एआय-ऑडिओ किंवा एआय-व्हिडिओ डिटेक्ट करण्याचं फीचर अद्याप आपल्याकडे नाही. मात्र मेटाने असं फीचर लाँच केलं आहे, ज्यामुळे पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला व्हिडिओ किंवा ऑडिओ एआय-जनरेटेड आहे का हे सांगता येणार आहे. (About AI Generated audio-video)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT