मुंबई : एमजी मोटार इंडियाने एआय असिस्टंट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञानासह भारतीय बाजारपेठेत पहिली एसयूव्ही एमजी ॲस्टर कार सादर केली आहे.
मुंबई : एमजी मोटार इंडियाने एआय असिस्टंट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञानासह भारतीय बाजारपेठेत पहिली एसयूव्ही एमजी ॲस्टर कार सादर केली आहे. 
विज्ञान-तंत्र

MG Astor SUV कार भारतीय बाजारात दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एमजी मोटार इंडियाने (MG Motor India) एआय असिस्टंट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञानासह भारतीय बाजारपेठेत पहिली एसयूव्ही एमजी ॲस्टर कार MG Astor SUV Car) सादर केली आहे. जागतिक पातळीवर यशस्वी ठरलेल्या झेडएसवर ॲस्टर एमजी आधारित आहे. एमजी ॲस्टर येत्या १९ सप्टेंबरपासून एमजी शोरूममध्ये उपलब्ध होईल आणि त्यानंतर लवकरच नोंदणीला सुरुवात होणार आहे. ही एसयूव्ही कार दोन इंजिनांमध्ये उपलब्ध असणार आहे. एक ब्रिट डायनॅमिक २२० टर्बो पेट्रोल इंजिन, ज्यात ६-स्पीड एटी आहे. जे तब्बल २२० एनएम टॉर्क आणि १४० पीएस पॉवर देते. दुसरे - मॅन्युअल ट्रान्समिशनसह व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन आणि ८-स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क आणि ११० पीएस पॉवर देते. एमजी ॲस्टरच्या वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये माणसासारख्या भावना आणि आवाजाची वैशिष्ट्ये जोडली आहेत.

पॅराॅलिम्पिक ॲथलिट दीपा मलिकने वैयक्तिक एआय साहाय्यकाला आपला आवाज दिला आहे. ॲस्टरमधील एआय तंत्रज्ञान एमजीच्या संभाव्यतेच्या कार-एज-ए-प्लॅटफॉर्मच्या (सीएएपी) कल्पनेभोवती विकसित केले गेले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्याच्या आवश्यकतेनुसार सेवा अंगीकृत करणे शक्य होईल. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष राजीव चाबा म्हणाले, की आमच्याकडे वैयक्तिक एआय साहाय्यकासह ऑटोनॉमस लेव्हल २, एमजी ॲस्टर आहे. त्याचे सुंदर बाह्यभाग, आलिशान इंटिरिअर आणि भविष्यातील तंत्रज्ञानामुळे, आम्हाला विश्वास आहे की ॲस्टर हे एक परिपूर्ण पॅकेज आहे जे ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल.

कारची फीचर्स

एमजीने अॅस्टरमधील एडीएएससाठी (प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम) बॉशबरोबर भागीदारी केली आहे. एआय तंत्रज्ञान, सहा रडार आणि पाच कॅमेरे एसयूव्हीला १४ प्रगत ऑटोनॉमस लेव्हल २ वैशिष्ट्ये प्रस्थापित करण्यासाठी सज्ज करतात. ही कार ईएसपी, टीसीएस आणि एचडीसीसारख्या २७ मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित करते. त्याच्या आराम, सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ६ एअरबॅग्स, ६-वे पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, गरम ओआरव्हीएम, रेन-सेन्सिंग वायपर, पीएम २.५ फिल्टर, पॅनोरॅमिक स्काय रूफ, रिअर एसी व्हेंट आणि फ्रंट आणि रिअर आर्मरेस्ट, १०.१ इंच एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ७ इंच एम्बेडेड एलसीडी स्क्रीनसह पूर्ण डिजिटल क्लस्टर यांचा समावेश आहे. अॅस्टरमध्ये एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञानावरील ८०+ इंटरनेट वैशिष्ट्ये आहेत.

लंडन येथील एमजीच्या जागतिक डिझाइन केंद्राचे प्रगत डिझाइन संचालक कार्ल गॉथम म्हणाले, भावनिक चलनशक्ती ही संकल्पना ॲस्टरला प्रीमियम फील आणते. अपवादात्मक पातळीच्या तपशीलासह उल्लेखनीय वैशिष्ट्यांमुळे ही मिड-साइज एसयूव्ही डोळ्यांचे पारणे फेडते. कार तयार करताना आम्ही डिझाइन केंद्रस्थानी ठेवले आहे. जेणेकरून ती त्याच्या तंत्रज्ञानाइतकी चपखल दिसेल. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइन उत्कृष्टतेसह एमजीच्या ब्रँडचा वारसा पुढे नेते. वैयक्तिक एआय साहाय्यासह एमजी ॲस्टर भारतीयांना सुलभ ड्रायव्हिंगचा अनुभव देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT