Mobile Care Tips in Monsoon Sakal
विज्ञान-तंत्र

Mobile Care Tips in Monsoon: पावसात मोबाईल भिजल्यास लगेच करा 'या' गोष्टी, फोन होणार नाही खराब

Mobile Care Tips in Monsoon: देशात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशा वेळी मोबाईल पाण्यात भिजल्यास कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Mobile Care Tips in Monsoon: देशात मान्सून दाखल झाला असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात अनेक लोक फिरायला किंवा ट्रेकिंगला जातात. अशावेळी मोबाईलची कितीही काळजी घेतली तरी तो भिजतो. तसेच अनेकवेळा जोरदार पाऊस असेल तर दुचाकीवर ऑफिसमधून घरी येताना किंवा चालत असलो तरी फोन भिजतो.

सध्या फोन हा आपल्या जीवनातील आवश्यक घटक बनला आहे. पाण्यामुळे फोन खराब होऊ शकतो. फोन दुरूस्तीला दिला तरी खुप खर्च होतो. यामुळे पाण्यात फोन भिजला तर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.

फोन भिजल्यास काय करावे

पावसात फोन भिजल्यास सर्वात आधी स्विच ऑफ करावा.

त्यानंतर सुती कापड्याच्या मदतीने फोन बाहेरच्या बाजूने कोरडा करावा.

फोनमधील सीम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढावे.

काय करू नये

पावसात फोन भिजल्यास तो बंद पडतो. अशावेळी फोन बंद पडला म्हणून चार्जिंगला लावू नका.

अनेक लोक फोनमधील पाणी काढण्यासाठी जोरात झटकतात. पण असे करू नका.

फोन ओला झाला म्हणून अनेक लोक उन्हात ठेवतात. पण असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे पोनची बॅटरी खराब होऊ शकते.

अनेक लोक फोनमधील पाणी शोषले जाण्यासाठी तांदळामध्ये ठेवतात.पण असे केल्याने फोनला तांदूळ चिपकून राहू शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! 'पोक्सो'मधील फरार संशयित गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा

Kolhapur Muncipal : विधानसभा निवडणुकीसारखीच खर्च दरसूची; उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर

Divyang Marriage Scheme : आता विवाहासाठी दिव्यांगांना मिळणार 'इतके' लाख रुपये; निम्मी रक्कम असणार फिक्स डिपॉझिट, कागदपत्रे आणि अटी काय?

SCROLL FOR NEXT