Mobile Network Issue eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Network Issue : घरात ठराविक ठिकाणीच मिळतं नेटवर्क? एक सोपी ट्रिक अन् कुठल्याही खोलीत येईल रेंज!

Mobile Range at Home : बऱ्याच वेळा आपल्याला घरात एकाच ठिकाणी चांगलं नेटवर्क मिळतं, मात्र दुसरीकडे आजिबात नाही.

Sudesh

आजकाल मोबाईल हा आपल्या शरीराचाच एक भाग असल्यासारखं आहे. घरात बसून असलं तरीही लोक करमणुकीसाठी मोबाईलवर काहीतरी बघत बसतात. वर्क फ्रॉम होममुळं कित्येक जणांचं कामच मोबाईलवर असतं. त्यामुळेही घरात मोबाईल घेऊन बसावं लागतं. मात्र, कित्येक जणांच्या घरी अगदी ठराविक ठिकाणीच मोबाईलला चांगलं नेटवर्क मिळतं.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल, की घरात एखाद्या रुममध्ये, किंवा एखाद्या खिडकीतच चांगली रेंज मिळते. मात्र, दुसरीकडे आजिबातच नेटवर्क दिसत नाही. अशा वेळी केवळ कॉल करण्यासाठीही उठून दुसरीकडं जावं लागतं. तुमच्याही घरात अशीच समस्या असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

फोनची सेटिंग तपासा

कित्येक वेळा फोनमध्ये सगळीकडे नेटवर्क न येण्याचं कारण नेटवर्क सेटिंग असतं. तुमच्या फोनमध्ये जर 2G किंवा 3G नेटवर्क सुरू असेल तर तुम्हाला सगळीकडे नेटवर्क मिळू शकत नाही. यामुळे तुमच्या फोनची नेटवर्क सेटिंग 4G किंवा 5G करुन घ्या. (Mobile Tips)

काचेचा ग्लास

हा उपाय ऐकायला विचित्र वाटेल. मात्र, कित्येक तज्ज्ञांनी याचा सल्ला दिला आहे. तुमच्या फोनला घरामध्ये आजिबातच नेटवर्क नसेल, तर फोन एका काचेच्या ग्लासमध्ये ठेवा. यानंतर तुम्हाला काही प्रमाणात नेटवर्क मिळेल.

सिग्नल बूस्टर

साध्या उपायांनी काही मदत होत नसेल, तर तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. बाजारात नेटवर्क बूस्टर नावाचं डिव्हाईस मिळतं. यालाच सिग्नल बूस्टरही मिळतात. यामुळे तुम्हाला संपूर्ण घरामध्ये नेटवर्क मिळू शकतं. यासाठी तुम्हाला सुमारे २ हजार रुपये खर्च करावा लागेल.

सिम कंपनी बदला

तुमच्या घरी नेटवर्क न येण्याचं कारण असंही असू शकतं, की तुमच्याकडे असलेल्या सिम कंपनीचा टॉवर तुमच्या घराजवळ नसेल. यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्या सिमकार्डला चांगली रेंज मिळते हे तपासून त्या कंपनीकडे तुमचा नंबर पोर्ट करून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT