Narendra Modi Selfie News
Narendra Modi Selfie News Narendra Modi Selfie News
विज्ञान-तंत्र

Selfie Types : चर्चेत राहण्यासाठी अनेकजण घेतात 'या' सेल्फींचा आधार

सकाळ डिजिटल टीम

Mobile Selfie Types : सध्या लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला मोबाईलची क्रेझ आहे. त्यात अनेकांना सेल्फी घेण्याचाही नाद आहे. आपल्यापैकी अनेकजण फिरायला गेल्यानंतर, मित्रांना भेटल्यानंतर सेल्फी काढतात.

आज आम्ही तुम्हला सेल्फीचे प्रकार आणि त्यांच्या नावांबद्दल माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला पुढच्यावेळी नेमका कोणता सेल्फी काढायचा हे ठरवणे आणि त्यापद्धतीने पोझ द्यायला मदत होईल.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

हेल्दी सेल्फी : अनेकदा जेव्हा लोक आम्ही आरोग्याबाबत अतिशय जागरूक असल्याचे दाखवतात आणि फोटो काढतात अशा फोटोंना हेल्दी सेल्फी असे म्हणतात. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास एखादी व्यक्तीने जिममध्ये वर्कआऊट करताना किंवा हेल्दी फूडखाताना फोटो टाकत असेल तर, अशा फोटोंना हेल्दी सेल्फी असे संबोधले जाते.

व्हॅलिडेशन सेल्फी : समजा तुम्ही नव्या प्रकारे हेअर स्टाईल केली असेल आणि त्याचा सेल्फी तुम्ही काढला तर, अशा सेल्फीला व्हॅलिडेशन सेल्फी असे म्हणतात. याशिवाय आरशात बघून तुम्ही सेल्फी घेत असाल तर त्यालादेखील व्हॅलिडेशन सेल्फी म्हणतात.

स्नॅप हॅपी सेल्फी : या सेल्फीमध्ये फोटो काढणारी व्यक्ती वेगळ्या प्रकारचा मूड दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारचे सेल्फी बहुतेकदा एकटे असताना घेतले जातात.

अॅम्फिटायझर सेल्फी : एखादी व्यक्ती आजारी असल्यास, औषधे घेताना किंवा कोणत्याही प्रकारचे उपचार घेताना फोटो काढतात. अशा फोटोंना अॅम्फिटायझर सेल्फी असे म्हटले जाते.

व्हिक्टरी सेल्फी : जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीत विशेष यश प्राप्त केले असेल तर, त्यावेळी व्हिक्ट्री सेल्फी घेतला जातो.

डकफेस सेल्फी : जेव्हा पुट बनवून किंवा बदकासारखा चेहरा करून सेल्फी क्लिक केला जातो तेव्हा त्याला डकफेस सेल्फी असे म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT