Motorola Edge 60 Fusion Mobile Launch Features and Price esakal
विज्ञान-तंत्र

Motorola New Mobile : एकच झलक,सबसे अलग! ब्रँड कॅमेरा क्वालिटीसह लाँच झाला Motorola Edge 60 Fusion, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

Motorola Edge 60 Fusion Mobile Launch Features and Price : मोटोरोला एज 60 फ्यूजन मोबाईल भारतात लॉन्च झाला आहे. यांचे आकर्षक फीचर्स आणि किंमत जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Motorola Edge 60 Fusion Price Details : भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये मोटोरोला एज 60 फ्युजनने धडाक्यात एन्ट्री घेतली आहे. तगड्या स्पेसिफिकेशन्स आणि आकर्षक डिझाइनसह हा फोन अनेक महिने चर्चेत होता. अखेर हा फोन भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध झाला असून मिडरेंज सेगमेंटमध्ये हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

किंमत आणि उपलब्धता

मोटोरोला एज 60 फ्युजन दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

8GB RAM + 256GB स्टोरेज – 22,999 रुपये

12GB RAM + 256GB स्टोरेज – 24,999 रुपये

हा फोन निळा, गुलाबी आणि जांभळा या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. भारतात 9 एप्रिल 2025 पासून Flipkart वर दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. बँक ऑफर्सचा लाभ घेतल्यास हा फोन 20,999 रुपयेमध्ये मिळण्याची संधी ग्राहकांना मिळेल.

डिस्प्ले आणि डिझाईन

मोटोरोला एज 60 फ्युजनमध्ये 6.7-इंचाचा 1.5K (1220x2712 पिक्सेल) pOLED ऑल-कर्व्हड डिस्प्ले आहे. 120Hz रिफ्रेश रेट, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस यामुळे हा डिस्प्ले जबरदस्त व्हिज्युअल अनुभव देतो. याशिवाय Water Touch 3.0, HDR10+ सपोर्ट आणि Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन यामुळे तो अधिक सुरक्षित आणि टिकाऊ आहे.

परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर

हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7400 SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 12GB LPDDR4X RAM आणि 256GB uMCP स्टोरेज आहे. तसेच, 1TB पर्यंतचा microSD कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये Android 15 आधारित Hello UI असून, कंपनी 3 वर्षांचे Android अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.

उत्कृष्ट कॅमेरा सेटअप

मोटोरोला एज 60 फ्युजनमध्ये 50MP Sony कॅमेरा (f/1.8 अपर्चर, OIS सपोर्ट) आहे. याशिवाय, 13MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 3-in-1 लाइट सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा (f/2.2 अपर्चर, 4K रेकॉर्डिंग सपोर्ट) देण्यात आला आहे. यामध्ये Moto AI फीचर्स, फोटो एन्हान्समेंट, अ‍ॅडॉप्टिव्ह स्टॅबिलायझेशन आणि मॅजिक इरेजर यांसारखे अत्याधुनिक फिचर्स आहेत.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

मोटोरोला एज 60 फ्युजनमध्ये 5,500mAh बॅटरी असून, ती 68W Turbo Charging सपोर्ट करते. या फोनमध्ये Dolby Atmos सपोर्ट ड्युअल स्टेरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत, जे उत्तम ऑडिओ अनुभव देतात.

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, Galileo, NFC आणि USB Type-C पोर्ट यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, MIL-810H मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि IP68/IP69 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स यामुळे हा फोन अधिक सुरक्षित आणि टिकाऊ आहे.

मोटोरोला एज 60 फ्युजन हा उत्कृष्ट स्पेसिफिकेशन्स आणि किफायतशीर किंमतीचा उत्तम पर्याय आहे. अत्याधुनिक डिस्प्ले, ताकदवान प्रोसेसर, प्रभावी कॅमेरा आणि दमदार बॅटरी यामुळे हा स्मार्टफोन गेमिंग, मल्टीटास्किंग आणि फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम ठरतो. जर तुम्ही एक दमदार स्मार्टफोन शोधत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

Nicholas Saldanha Died: महाराष्ट्राचे दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT