Mukesh Ambani News esakal
विज्ञान-तंत्र

Mukesh Ambani News: लॅपटॉप बाजारात 'जिओ' धुमाकूळ घालणार; जाणून घ्या किंमत

किती रुपयांना मिळणार अंबानींचा नवाकोरा लॅपटॉप?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः काही वर्षांपूर्वी 'जिओ' लाँच करुन टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातलेले मुकेश अंबानी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांची रिलायन्स जिओ ही कंपनी स्वस्तातला लॅपटॉप बाजारात आणणार आहे.

अंबानींच्या या लॅपटॉपची किंमत केवळ 184 डॉलर असणार असणार आहे. भारतीय रुपयांमध्ये साधारण 15 हजार रुपयांमध्ये हा लॅपटॉप खरेदी करता येईल. या लॅपटॉपचं नाव जिओ बुक ठेवण्यात आलेलं आहे. यापूर्वी कंपनीने स्वस्तातला जिओ फोन बाजारात आणला होता. जिओ फोनच्या यशानंतर आता लॅपटॉप बाजार हे कंपनीचे लक्ष्य आहे.

सध्या मार्केटमध्ये एचपी, डेल आणि लिनोओ या कंपन्यांचा दबदबा आहे. रियायन्सच्या लॅपटॉप बाजारातील एन्ट्रीने किंमतीत आणि सुविधांमध्ये चुरस निर्माण होईल, हे नक्की. विशेष म्हणजे या लॅपटॉपमध्ये 4जी सीम चालणार आहे. त्यासाठी रिलायन्सने क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीसोबत करार केलाय.

'क्वालकॉम'कडून यासाठी चिप टेक्नॉलॉजी मिळणार असून मायक्रोसॉफ्ट काही अॅप्ससाठी सपोर्ट करणार आहे. सध्या जिओकडे ४२ कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. टेलिकॉम क्षेत्रातली ही सर्वात मोठी कंपनी आहे. यासंदर्भात कंपनीने माहिती दिली नसली तरी रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: पन्नास हजार कुटुंबांची दिवाळी नव्या घरात; अजित पवार यांच्या घोषणेची बीडमध्ये पूर्तता

भारतीय सिनेसृष्टीला आणखी एक धक्का ! अभिनेते सतीश शाह यांचं निधन

paschim maharashtra: मिरजेत रात्रीत शेळ्या-मेंढ्या चोरीला गेल्या; मेंढपाळांनी पोलिसांना इशारा दिला, ‘चोरटे पकडले नाही तर...’

Wi-Fi Tips: रात्री वाय-फाय बंद का करावे? अर्ध्याहून अधिक लोकांना माहिती नाहीत फायदे

Katraj News: कात्रजमध्ये दुर्गंधीचा त्रास! नानासाहेब पेशवे तलाव परिसरात कचऱ्याचा साठा

SCROLL FOR NEXT