MWC 2024 Launches eSakal
विज्ञान-तंत्र

MWC 2024 : नवे स्मार्टफोन, गॅलेक्सी रिंग, श्याओमी इलेक्ट्रिक कार.. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये काय-काय होणार लाँच?

MWC Updates : लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या इव्हेंटमध्ये लिनोव्होचा नवीन लॅपटॉप लाँच होणार आहे. या लॅपटॉपचं वैशिष्ट्य म्हणजे, हा पूर्णपणे पारदर्शक असणार आहे.

Sudesh

Mobile World Congress 2024 : वर्षातील मोठ्या टेक इव्हेंट्सपैकी एक म्हणजे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस. बार्सिलोनामध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये जगभरातील टेक कंपन्या आपली नवी उत्पादने सादर आणि लाँच करतात. यावर्षी 26 ते 29 फेब्रुवारी असा चार दिवस हा मेगा इव्हेंट चालणार आहे. या इव्हेंटमध्ये कित्येक मोठ्या घोषणा होणार आहेत. (MWC Barcelona)

स्मार्टफोन्स

स्मार्टफोन सेगमेंटमध्ये श्याओमीने इव्हेंट सुरू होण्यापूर्वीच माहिती दिली आहे. लेइका (Leica) कॅमेरा असणाऱ्या Xiaomi 14 सीरीजचं लाँचिंग या इव्हेंटमध्ये होणार आहे. यासोबतच दरवर्षी वनप्लस (OnePlus) देखील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नवीन घोषणा करत असतं. नोकिया स्मार्टफोन बनवणारी HMD कंपनी देखील आता स्वतःच्या ब्रँडनेमने मोबाईल बनवणार आहे. या नव्या स्मार्टफोन सीरीजचं लाँचिंग MWC 2024 मध्ये होऊ शकतं.

गॅजेट्स

या टेक इव्हेंटमध्ये श्याओमी आणि वनप्लस आपल्या नव्या स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे. लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार Xiaomi Watch 2 आणि OnePlus Watch 2 अशा या दोन स्मार्टवॉच असतील. यासोबतच सॅमसंग आपली बहुप्रतिक्षित Galaxy Ring ही स्मार्ट अंगठी देखील या इव्हेंटमध्ये सादर केली जाऊ शकते.

लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या इव्हेंटमध्ये लिनोव्होचा नवीन लॅपटॉप लाँच होणार आहे. या लॅपटॉपचं वैशिष्ट्य म्हणजे, हा पूर्णपणे पारदर्शक असणार आहे. (Lenovo Transparent Laptop) याव्यतिरिक्त Lenovo आणि इतर कंपन्यांचे काही लॅपटॉप देखील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लाँच होतील.

श्याओमीची इलेक्ट्रिक कार

या इव्हेंटमध्ये श्याओमीची इलेक्ट्रिक कार ही चर्चेचा विषय ठरणार आहे. खरंतर चीनमध्ये कंपनीने ही कार आधीच सादर केली आहे. Xiaomi SU7 या इलेक्ट्रिक कारची विक्री अद्याप सुरू झालेली नाही. या सेडान कारमध्ये कित्येक अत्याधुनिक फीचर्स दिले असल्याचं सांगण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : 2014ला अदानी महाराष्ट्रात एका ठिकाणी होते, आता...; राज ठाकरेंनी नकाशाच दाखवला

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT